फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलचा सामन्याला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने एकही सामना न गमावता मालिका नावावर केली आहे. या स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये भारतीय संघाची लढत ही श्रीलंकेविरुद्ध झाली होती तर पाकिस्तानचा उपांत्य फेरिचा सामना हा बांग्लादेशविरुद्ध पार पडला. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने बांग्लादेशला सेमीफायनलमध्ये पराभूत करुन अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या स्पर्धेत दुसऱ्यांदा सामना होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान अंडर 19 संघाचा आशिया कप फायनलच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या संघाचे कर्णधारपद हे फरहान युसूफ याच्याकडे आहे. भारताच्या संघाने आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या आजच्या कामगिरी क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे. सकाळी गोलंदाजांना मदत मिळू शकते, त्यामुळे भारत सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करू शकतो.
🚨 Toss 🚨 India U19 have won the toss and elected to field first in the #Final. Updates ▶️ https://t.co/ht0DLU8XQ3#MensU19AsiaCup2025 pic.twitter.com/Jgjo1c1TvB — BCCI (@BCCI) December 21, 2025
या स्पर्धेत विजयी घोडदौड करत, टीम इंडिया अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून जेतेपदावर लक्ष केंद्रित करेल. भारताने आतापर्यंत आठ वेळा अंडर-१९ आशिया कप एकदिवसीय विजेतेपद जिंकले आहे. पाकिस्तानने फक्त एकदाच जेतेपद जिंकले आहे, जेव्हा २०१२ मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांना ट्रॉफी सामायिक करावी लागली होती. भारतीय संघाने या स्पर्धेच्या गट टप्प्यात आधीच एकदा पाकिस्तानला पराभूत केले आहे, त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा अपेक्षित आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दिपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंग
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन: उस्मान खान, समीर मिन्हास, फरहान युसूफ (कर्णधार), अहमद हुसैन, हुजैफा अहसान, हमजा जहूर (यष्टीरक्षक), नकाब शफीक, मोहम्मद शायन, अब्दुल सुभान, मोहम्मद सय्यम, अली रझा






