Nagarparishad Election Result 2025 Live Updates: ११ टेबलांवर ८ फेऱ्यांत शिरपूर नगरपालिकेची मतमोजणी
Chhatrapati Sambhajinagar: घरात एकटी असताना 18 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या; एकही साक्षीदार नाही,
मतमोजणीपूर्वी ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेला मुकेशभाई पटेल टाऊन हॉल येथील स्ट्राँग रूम उमेदवार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत सकाळी साडेनऊ वाजता उघडण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून काटेकोर खबरदारी घेण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
मतमोजणीच्या कामकाजासाठी २८ मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली असून, इतर नियोजन व पूरक कामांसाठी ७२ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, जयपाल हिरे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून आहेत. (Nagarpanchayat Election Result 2025 LIVE Updates)
दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे भाजपाकडून माजी मंत्री व आमदार अमरीशभाई पटेल यांचे पुत्र चिंतनभाई पटेल हे उमेदवार असून, शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार कै. प्रल्हादराव पाटील यांचे नातू हेमंत पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहेत. या दोन्ही प्रमुख उमेदवारांमध्ये अटीतटीची स्पर्धा असल्याने शिरपूर नगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीला सुरुवात होताच उमेदवार, कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून निकालाबाबत शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिरपूर नगरपालिकेच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज मतमोजणीअंती होणार असल्याने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.






