चीनमध्ये रोबोट्सचा स्टेजवर जलवा! जबरदस्त डान्सने केलं जगला हैराण, मस्कही थक्क, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
लीहोमचा कॉन्सर्ट चीनच्या बेस्ट प्लेस टूर चा भाग होता. यावेळी त्याच्यासोबत सहा ह्युमनॉइड रोबोट्स स्टेजवर आले आणि त्यांनी अतिशय जबरदस्त डान्स केला आहे. ओपन फायर या लीहोमच्या गाण्यावर हे रोबोट्स डान्स करत आहेत. हे रोबोट्स अगदी मानवाप्रमाणे फ्लिप मारत आहे, डान्स स्टेंप्स करत आहेत. एका मानवाशी पूर्णपणे सुसंगत करत आहे. स्वत: एलॉन मस्क यांनी हा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मस्क यांनी म्हटले आहे की, प्रभावी, अगदी डान्ससारखे स्टेजवर नाचत आहेत. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Zuckerberg आणि Musk झाले रोबोट डॉग! व्हायरल VIDEO ने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ
Impressive https://t.co/IacxCOxpki — Elon Musk (@elonmusk) December 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हे ह्यूमनॉइड रोबोटो हांग्झूमधूल युनिटरी रोबोटिक्स या कंपनीचे आहे. यापूर्वी देखील चिनने असे अनेक प्रयोग केले आहे. चीनने काही महिन्यांपूर्वी ह्यूमनॉइट रोबोट्सची बॉक्सिंग स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा देखील झाली होती. हे दोन्ही खेळ एआय तंत्रज्ञानाद्वारे चावल्या जाणाऱ्या ह्यूमनॉइड रोबोट्सने खेळले होते. या सामान्याचा उद्देश रोबोट्सची निर्णय घेण्याची क्षमता तपासणे, त्याची चपळता आणि संतुलनाची क्षमता पाहणे होता.
गेल्या काही काळात अनेक ठिकाणी ह्यूमनॉइड रोबोट्स पाहायला मिळत आहेत. मोठ मोठ्या रेस्टॉरंटमध्ये, कॅफेत रोबोट सेवा देताना पाहायला मिळत आहेत. सौदी अरेबियाने हज यात्रेदरम्यान मक्का आणि मदिनाच्या मशिदीत एक रोबोट ठेवला होता. शिवाय काही दिवसांपूर्वी मार्क झुकरबर्ग, एलॉन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या सारख्या प्रतीकृतींचे रोबोट डॉग्सही व्हायरल झाले होते. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती.
चीनमध्ये आयोजित करण्यात आली रोबोटची पहिली किक-बॉक्सिंग स्पर्धा; VIDEO व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






