Nagarparishad Election Result 2025 Live Updates
या निवडणुकांमध्ये केवळ महायुतीच नव्हे, तर महाविकास आघाडीतील घटक पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे आजच्या निकालांमधून स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे स्पष्ट होणार असून, निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. दरम्यान, तळकोकणातील कणकवली नगरपंचायत, मालवण नगरपरिषद, वेंगुर्ले नगरपरिषद आणि सावंतवाडी नगरपरिषद येथे पाच फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार असून, निवडणूक आयोगाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे.
या निवडणुकांत भाजपने जिल्ह्यात स्वबळाचा नारा देत निवडणूक लढवली असल्याने पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांची कसोटी लागली आहे. मालवणमध्ये आमदार निलेश राणे, तर सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे दीपक केसरकर यांचीही प्रतिष्ठा या निकालांवर अवलंबून आहे.
मालवण : कोकणातील नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकांदरम्यान काही ठिकाणी राजकीय वाद आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या. मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ करत भाजपचे पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या वाहनातून रोकड जप्त केल्याची कारवाई केली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी स्वतः मालवण पोलीस ठाण्यात जाऊन कारवाई करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचंही समोर आलं.
याचदरम्यान भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत ते खोटे असल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्व घडामोडींमुळे मालवणमध्ये शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, यापूर्वी मालवण नगरपरिषदेत उबाठा गटाचा नगराध्यक्ष असल्याने ही जागा टिकवण्याचे आव्हान उबाठा गटासमोर असून, पर्यायाने माजी आमदार वैभव नाईक यांचीही प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. कोकणातील या राजकीय संघर्षामुळे Konkan Nagarparishad–Nagarpanchayat Election Result 2025 कडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आजच्या निकालांतून या वादांचा परिणाम स्पष्ट होणार आहे.
Jeffery Epstein Files : असा मिळायचा अल्पवयीन मुलींना ‘भाव’ ; एक रशियन तब्बल ‘इतक्या’ डॉलर्सला
सिंधुदुर्ग- कणकवलीमध्ये नितेश राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजविरोधात असलेल्या सर्व पक्षांच्या कार्यककर्त्यांकडून नितेश राणेंना घेरण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी शहर विकास आघाडीची स्थापना कऱण्यात आली. नितसे राणेंनी प्रतिनिधीत्व केल्याने राणे विरूद्ध राणे असा राजकीय संघर्ष निर्णाण झाली. त्यामुळे नितेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागला आहे.
सिंधुदुर्ग- शिंदे गटाचे आमदार दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी नगरपरिषद आणि वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी भाजपने सावंतवाडीत थेट घेराबंदी करत निवडणूक लढवली आहे. तसेच वेंगुर्ले नगरपरिषद ही केसरकर यांच्या मतदारसंघात येत असल्याने या दोन्ही ठिकाणी त्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, यापूर्वीही सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषदांमध्ये भाजपची सत्ता होती. त्यामुळे यावेळी भाजप आपली सत्ता कायम राखतो की केसरकर गट आपला प्रभाव टिकवतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
– सावंतवाडी नगरपरिषद
सावंतवाडी हा दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी सर्व प्रमुख पक्षांनी ताकद पणाला लावल्याने येथे चुरशीची लढत होत आहे.
श्रद्धा सावंत–भोसले (भाजप)
नीता सावंत–कविटकर (शिवसेना – शिंदे गट)
सीमा मटकर (उबाठा)
साक्षी वंजारी (काँग्रेस)
– कणकवली नगरपरिषद (Kankavali Nagar Parishad)
कणकवलीत भाजप आणि उबाठा–शिंदे गटाच्या शहर विकास आघाडीमध्ये थेट सामना होत असून, येथेही प्रतिष्ठेची लढत रंगली आहे.
समीर नलावडे (भाजप)
संदेश पारकर (उबाठा व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडी)
– मालवण नगरपरिषद (Malvan Nagar Parishad)
मालवणमध्ये राणे विरुद्ध राणे असा थेट सामना पाहायला मिळत असून, ही लढत राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
शिल्पा खोत (भाजप)
ममता वराडकर (शिवसेना – शिंदे गट)
पूजा करलकर (उबाठा)






