कानपूर : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. पावसामुळे पहिला दिवस लवकर संपला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात निराशाजनकच राहिली. बांगलादेशला आजच्या दिवसात 3 गडी गमावून 107 धावाच करता आल्या. आकाश दीप, ज्याने या वर्षी ढगाळ वातावरणात भारतासाठी कसोटी पदार्पण केले, त्याने चमकदार गोलंदाजी केली.
आकाशदीपच्या चेंडूवर शादाम इस्लाम बाद झाल्यानंतर रोहित शर्माला धक्का
Surprise, surprise Rohit Sharma! 😍
A successful review by the #TeamIndia skipper brings Akash Deep his 2nd wicket of the game! 🙌#INDvBAN #JioCinemaSports #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/YiJMxqzbXm
— JioCinema (@JioCinema) September 27, 2024
बांगलादेशच्या 3 खेळाडू पॅव्हेलिनमध्ये
बांगलादेशकडून पहिल्या दिवशी त्याने 2 बळी घेतले. झाकीर हसनला आकाशने बाद केल्यानंतर शादमान इस्लाम 24 धावांवर LBW आऊट झाला. मात्र, अंपायरने तत्पूर्वी आकाश दीपच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आणि शदमानला बाद घोषित केले नाही. मात्र, यानंतर कर्णधार रोहित शर्माने डीआरएस घेतला. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले. आणि यानंतर थर्ड अंपायरने आऊट दिला अन् रोहित शर्मा आश्चर्यचकीत झाला. कॅप्टन रोहित शर्माचे थर्ड अंपायरच्या निर्णयाने तोंड उघडेच राहिले, याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल रोहित शर्माची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.
रोहित शर्माला बसला धक्का
चेंडू थेट स्टंपमध्ये जात असल्याचे मोठ्या पडद्यावर दिसत होते. हे पाहिल्यानंतर कॅप्टन रोहितच्या आनंदाला पारावार उरला नाही. तो आनंदाच्या पलीकडे होता. त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. हिटमॅनच्या या प्रतिक्रियेचा व्हिडिओही आता समोर येत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मोमिनुल हक आणि मुशफिकर रहीम क्रीजवर
सध्या बांगलादेशकडून मोमिनुल हक आणि अनुभवी मुशफिकर रहीम फलंदाजी करत आहेत. हक 7 चौकारांच्या मदतीने 40 धावांवर खेळत आहे तर रहीम 6 धावांवर नाबाद आहे. भारताकडून आकाश दीपशिवाय रविचंद्रन अश्विननेही 1 बळी घेतला. त्याने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला 31 धावांवर बाद केले.
या सामन्यासाठी दोन्ही संघातील 11 खेळाडू खेळत आहेत
भारत- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश- शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.