संसद परिसरात राजीव शुक्ला आणि शशी थरूर(फोटो-सोशल मीडिया)
Discussion between Rajiv Shukla and Shashi Tharoor : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना १७ डिसेंबर रोजी लखनऊमध्ये खेळवला जाणार असताना दाट धुक्यामुळे आणि अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे रद्द करण्यात आला. एकही चेंडू न टाकता पंचांनी हा सामना रद्द केला होता. या घटनेने क्रिकेट आणि राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. दरम्यान, संसदेतील परिसरात कॉँग्रेस खासदार शशी थरुर आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यात चर्चा झाली.
हेही वाचा : Ashes 2025 : १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडले! ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीने केला ‘हा’ भीम पराक्रम
केरळची राजधानी तिरुवनंतपुरमचे येथील काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केरळमध्ये क्रिकेटचे सामने आयोजित करण्याबाबतचा मुद्दा X वर उपस्थित केला. त्यांनी पोस्ट केले आहे की, “जर सामना तिरुवनंतपुरममध्ये झाला असता तर हवामान वेगळे असते आणि सामना रद्द झाला नसता.” त्यांनी उत्तर भारतात हिवाळ्यात आयोजित करण्यात आलेल्या सामन्याच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
गुरुवारी संसद संकुलात या विषयावर शशी थरूर पत्रकारांशी बोलत असताना दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आले होते. तेव्हा हसत हसत शुक्ला यांनी थरूर यांना विचारले की ते कशाबद्दल बोलत आहेत. त्यावेळी केरळमध्ये सामने आयोजित करण्याबाबतचा सल्ला शशी थरूर यांनी राजीव शुक्ला यांना दिला. ते मणले की, जानेवारीमध्ये उत्तर भारताऐवजी केरळसारख्या राज्यात सामने आयोजित करण्याचा विचार करायला हवा. तसेच ते म्हणाले की “डिसेंबर ते जानेवारी दरम्यान केरळमध्ये तुलनेने स्वच्छ हवामान असते, जे क्रिकेटसाठी अधिक अनुकूल ठरते.”
Delhi: Congress MP Shashi Tharoor shared a lighthearted moment with BCCI Vice President and MP Rajeev Shukla after the IND vs SA 4th T20I match in Lucknow was called off due to excessive fog, saying, “The game should have been held in Kerala…” pic.twitter.com/6YeTjzzOIg — IANS (@ians_india) December 18, 2025
थरूर यांच्या टिप्पणीला उत्तर देत असताना राजीव शुक्ला म्हणाले की, “केरळसाठी वेळापत्रक निश्चितपणे विचारात घ्यायला हवे. त्यांनी असे देखील म्हटले की भविष्यात या सूचनेवर निश्चितच विचार केला जाईल, परंतु त्यासाठी वेगळे धोरण आहे.” थरूर यांनी १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीबद्दल सांगण्यास सुरुवात केली तेव्हा राजीव शुक्ला यांनी विनोदाने टिप्पणी करत म्हटले की, “जगभरातील सामने केरळमध्ये हलवले जाणार नाहीत.’






