येत्या 22 डिसेंबरला योध्येतील भव्य श्री राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या तयारी दरम्यान अयोध्येतून एक मोठी माहिती समोर येत आहे. अयोध्येत देशातील सर्वात मोठी मशिद (Indias Biggest Mosque) बांधण्यात येणार आहे. मशिदीच्या बांधकामाबाबत (Ayodhya Masjid) मोठी माहिती समोर येत आहे. या मशिदीची पायाभरणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. रमजानपूर्वी मशिदीचा पाया रचला जाईल. भारतातील सर्वात मोठ्या प्रस्तावित मशिदीत पहिली नमाज मक्काचे इमाम अब्दुल रहमान अल सुदाईस अदा करतील.
[read_also content=”शबरीमलाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस आणि ऑटोमध्ये धडक; 5 जणांचा मृत्यू! https://www.navarashtra.com/india/5-people-who-visited-sabarimala-temple-died-in-accident-in-kerala-mallapuram-nrps-489265.html”]
मशिदीचे प्रस्तावित नाव पैगंबर मोहम्मद यांच्या नावावर असेल. मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद या नावाने ओळखली जाईल. अयोध्येपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर मशिदीचे बांधकाम प्रस्तावित आहे. जगातील सर्वात मोठं कुराण मशिदीत ठेवण्यात येणार आहे. हे कुराण २१ फूट उंच आणि ३६ फूट रुंद असेल. ते 18-18 फुटांवर उघडेल.
वास्तविक बाबरी मशीद आणि रामजन्मभूमी पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेला रामजन्मभूमी मानून त्यावर भव्य राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. यासोबतच अयोध्येत मशीद बांधण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचे आदेशही सरकारला देण्यात आले होते. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी ५ फेब्रुवारीला ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली होती. त्याच दिवशी राज्य सरकारने अयोध्येतील रौनाही येथील धन्नीपूर गावात मशिदीसाठी मुस्लिम बाजूस ५ एकर जमीन दिली. सरकारने ही पाच एकर जमीन मशिदीसाठी सुन्नी वक्फ बोर्डाला दिली होती. सुमारे 6 एकर जागा खरेदी केल्यानंतर मशीद बांधकाम समितीने 11 एकर जागेवर मशीद बांधण्याचा निर्णय घेतला.
मशिदीच्या आवारात कॅन्सर हॉस्पिटल बांधले जाणार आहे. प्रत्येक धर्म-धर्माच्या लोकांना येथे मोफत उपचार मिळू शकतात. एवढेच नाही तर मशीद परिसरात शाळा, संग्रहालय आणि वाचनालय बांधले जाणार आहे. कॅम्पसमध्ये मोफत भोजन सुविधा असेल. इंजिनीअरिंग, मेडिकल, डेंटल अशी पाच महाविद्यालये येथे बांधली जाणार आहेत. कॅम्पसमध्ये दुबईपेक्षाही मोठे मत्स्यालय बांधले जाणार आहे.