मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात आल्याने मंगळवारी, ८ मार्चपासून महापालिकेच्या प्रशासक पदी इकबालसिंह चहल यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगरविकास खात्याने चहल यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभाराची सूत्रे सोपवली आहे. त्यामुळे चहल आता पालिकेचा कारभार पाहणार आहेत(Iqbal Singh Chahal as Administrator of Mumbai Municipal Corporation).
राज्य निवडणूक आयोगाने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका नियोजित वेळेत घेणे शक्य होणार नाहीत. तसेच संबंधित नागरी स्थानिक संस्थाची मुदत संपताच तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत आयोगाने कळवले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ६क (१) व (२) मधील तरतुदीनुसार ०७ मार्च २०२२ रोजी ही मुदत संपत असलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासक पदी विद्यमान महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेची नियोजित मुदत संपताच प्रशासक म्हणून कार्यभार स्विकारावा तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे राज्यपाल यांच्या आदेशानुसार कळवण्यात आले. त्यानुसार चहल यांनी प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत.
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]