कसा झाला अपघात?
मृत्यू झालेल्या वारकऱ्यांचे नावे ह.भ.प. माऊली दिगंबरराव कदम, ह.भ.प. प्रसादराव कदम, (राहणार बोर्डी) तर ह.भ.प.दत्ता माणिकराव कऱ्हाळे राहणार मुडा अशी आहेत. हे तिघे परभणी तालुक्यातील पिंपळा येथील कीर्तन सोहळा आटपून दुचाकीने परभणी- जिंतूर मार्गाने बोर्डी गावाकडे निघाले. झरी जवळील लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येताच त्यांच्या दुचाकीचा व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना परभणी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केले जात आहे.
जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर; डिव्हायडरला धडकून पादचाऱ्यांवर घुसली कार, एकाचा मृत्यू, 16 जखमी
जयपूरमधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अपघातात एकाच मृत्यू तर १६ जण जखमी झाले आहे. एका भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडी कारचे नियंत्रण सुटले आणि ती प्रथम डिव्हायडरवर आदळली आणि नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या पादचाऱ्यांना आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांना धडकली. ही घटना जर्नलिस्ट कॉलनीमध्ये खरबास सर्कलजवळ घडल्याचे समोर आले आहे.
काय घडलं नेमकं?
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ऑडी भरधाव वेगात होती आणि दुभाजकाला धडकल्यानंतर तिचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार सुमारे ३० मीटर जात राहिली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या १२ हून अधिक गाड्यांना धडकली. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ बसलेल्या लोकांनाही या कारची धडक बसली.
उपस्थित नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचेल. जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी आठ जणांवर जयपुरिया रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर चार जखमींना त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात नेले. तर इतर चार जण प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह घरी परतले. तीन ते चार जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
Ans: परभणी–जिंतूर मार्गावर झरीजवळ लोअर दुधना कालव्याजवळ.
Ans: तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Ans: ह.भ.प. माऊली कदम, ह.भ.प. प्रसादराव कदम आणि ह.भ.प. दत्ता कऱ्हाळे.






