मुंबई:तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस सिझन १५’ ची (‘Bigboss 15’) विजेती ठरली आहे. ‘बिग बॉस १५’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरून तेजस्वी प्रकाशला या सिझनमध्ये 40 लाख बक्षिसाची रक्कम मिळाली आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर तेजस्वी प्रकाशने बिग बॉस सिझन पंधराच्या विजेत्याचा किताब पटकावला आहे.
तेजस्वी प्रकाश आणि प्रतिक सेहजपाल हे दोघेही अंतिम फेरीत पोहोचले आणि विजेता म्हणून तेजस्वी प्रकाश नाव घोषित करण्यात आलं. ‘बिग बॉस च्या पंधराव्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात(bigboss 15 grand finale)टॉप 5 मध्ये शमिता शेट्टी, (Shamita Shetty), प्रतिक सेहजपाल, (Pratik Sehjpal), करण कुंद्रा (karan kundra), निशांत भट्ट, (Nishant Bhatt) तेजस्वी प्रकाश (Tejasswi prakash) पोहोचले होते.
ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच बिग बॉसने टॉप ५ स्पर्धकांना १० लाख रुपयांची ऑफर दिली होती. बिग बॉसची ट्रॉफी आणि ५० लाख रुपये घ्या किंवा १० लाख रुपये घेऊन आत्ताच या घरातून बाहेर पडा. निशांत भट्टने ही ऑफर स्विकारून फिनालेच्या सुरुवातीलाच या शोमधून माघार घेतली.
सलमान खानने (Salman khan)निशांतच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली. तर शमिता शेट्टीलादेखील निशांतचा हा निर्णय धक्कादायक वाटला. निशांत बाहेर गेल्यानंतर शमिता शेट्टी, प्रतिक सेहजपाल, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश या स्पर्धकांमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी चुरस दिसून आली. यानंतर शमिता शेट्टी टॉप 3 मध्ये स्थान मिळवण्यास अपयशी ठरली. शमिता बाहेर पडल्यानंतर प्रतिक सेहजपाल, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश टॉप 3 मध्ये पोहचले आणि अंतिमत: या शोमध्ये तेजस्वी प्रकाशने बाजी मारली..
या ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसचे आधीचे विनर देखील उपस्थित होते. त्यांनीदेखील या मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स सादर केले.
तसंच ‘बिग बॉसचा 15’ च्या ग्रॅन्ड फिनालेला चार चॉंद लावले ते दीपिका पदुकोणने..(Deepika padukon) दीपिकाचा आगामी चित्रपट गेहराईयाँ (Gehraiyaan) हा 11 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिपीका आज बिग बॉसच्या मंचावर अवतरली. यावेळी सलमान खान आणि दीपिका पुदकोणची अनोखी केमेस्ट्री पाहायला मिळाली.