कल्याण डोबिवली एमआयडीसी परिसरात कंत्राटदारांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. ऐन पावसाळा तोंडावर आला असूनही नालेसफाई झाली नाही त्यामुळे अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी शिवसेनेच्या राजेश मोरे यांनी केली आहे. राजेश मोरे यांच्या सांगितले की, मी एमआयडीसी परिसरात दोन दिवसापूर्वी नाल्यांची पाहणी केली असता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम कंत्राटदाराने केले आहे. नालेसफाई असेल. नाल्यात टाकलेले र’बीट असेल. या प्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले आहे. जे कोणी कामात हलगर्जीपणा दाखवित आहेत. मग ते एमआयीडीसीचे अधिकारी असोत किंवा कंत्राटदार असू देत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. पावसाळा जवळ आला आहे. नाले कधी भरण्याची शक्यता आहे. लोकांच्या घरात पाणी जाऊ शकते. त्यामुळे उद्याेगमंत्र्याकडे मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदार आणि कामात हलगर्जी करणारे एमआयडीसीचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.
कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना राबवावी हे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वप्न आहे. डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर परिसरात साडे तीन एकर माेकळ्या जागेवर क्लस्टर योजना राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली. आज आमदार मोरे यांनी आयुक्त गोयल यांची भेट घेतली. आमदार मोरे यांनी केलेल्या मागणीनुसार आजपासून सर्वेक्षणाला सुरुवात केली जाणार असल्याचे आश्वासन आयुक्त गोयल यांनी आमदार मोरे यांना दिले असल्याची माहिती आमदार मोरे यांनी आयुक्तांच्या भेटीपश्चात दिली आहे.
आजदे गाव परिसरातील नाल्यात कंत्राटदाराकडून भराव टाकला जात आहे. नाल्यात भराव टाकणाऱ्या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गाेयल यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार मोरे यांनी केडीएमसी आयुक्तांची आज भेट घेतली. यावेळी कल्याण ग्रामीण मतदार संघातील एमआयडीसी निवासी भाग, सुनिलनगर, गांधीनगर परिसरात नाले सफाईची कामे योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
कल्याण-कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी आज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीण मतदार संघातील अमृत पाणी पुरवठा येजना, रस्त्यांची कामे,शाळा, क्लस्टर योजना या विविध विषथावर चर्चा केली. या चर्चेनंतर आयुक्त गोयल यांनी या विषयी सकारात्मक उत्तर दिले असल्याची माहिती बैठकीपाश्चात आमदार मोरे यांनी दिली आहे.