क्वालालंपूर : न्यूज एशिया वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (ता.२) मलेशियात १२६ मृत्यूंची नोंद झाली. गेल्यावर्षी पासून कोरोनाने थैमान घातल्यापासून ही आतापर्यंतची सर्वोच्च आकडेवारी ठरली आहे. याआधी २९ मे रोजी मलेशियात सर्वाधिक ९८ मृतांची नोंद झाली होती. मलेशियात वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता १ जूनपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने हैराण झालेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दिलासा मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. दुसरीकडे मलेशियात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने तडाखा दिला असल्याने तेथे तिसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
[read_also content=”आषाढीच्या पायी वारीला वाखरी ग्रामस्थांचा विरोध; मात्र वारीसाठी तडजोड न करण्याची भाजप आध्यात्मिक आघाडीची भूमिका https://www.navarashtra.com/latest-news/wakhri-villagers-oppose-ashadhis-footsteps-but-the-role-of-the-bjp-spiritual-front-is-not-to-compromise-for-wari-nrpd-137811.html”]
दरम्यान, बुधवारी मृत्यू झालेल्या १२६ पैकी १२३ नागरिक हे मलेशियाचे होते, तर उर्वरीत ३ परदेशी नागरिक होते. मलेशियात आतापर्यंत कोरोनामुळे २ हजार ९९३ जणांचा बळी गेला आहे. बुधवारी दिवसभरात ७ हजार ७०३ नवे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत मलेशियातील ५ लाख ८७ हजार १६५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच तेथे सध्या ८२ हजार २७४ सक्रिय रुग्ण आहेत.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येदरम्यान मलेशियातील ८२ हजार ३४१ नवजात बालकांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोना संक्रमितांपैकी १९ हजार ८५१ मुले ही ४ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाची, तर ८ हजार २३७ मुले ही ५ ते ६ वर्षांच्या दरम्यानची होती.
[read_also content=”मुंबईतील ‘या’ कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी झिंगाट गाण्यावर केला डान्स, पीपीई किट घालून केली फुल ऑन धमाल – व्हिडिओ तुफान व्हायरल https://www.navarashtra.com/latest-news/health-proofessionals-of-goregav-covid-center-celebrate-one-year-of-it-operation-and-danced-on-zingat-song-nrsr-137792.html”]
दुसरीकडे, चीनच्या १६ लढाऊ विमानांनी हवाई हद्दीचा भंग करत मलेशियाच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यामुळे मलेशिया सरकार नाराज असून त्यांनी राजनैतिक मार्गाने निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या राजदूताला लवकरच पाचारण करून ही नाराजी व्यक्त केली जाईल, असे मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. चिनी विमानांनी मलेशियाच्या सार्वभौमतेला धक्का पोहोचवला असल्याची तक्रार मलेशियाने केली आहे.
malaysia enters nationwide total lockdown third times as covid 19 infections wave






