Sachin Tendulkar Praised Victorious Farewell to James Anderson : इंग्लंडचा महान गोलंदाज जेम्स अँडरसनने शुक्रवारी आपल्या दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीची सांगता केली. त्याने शेवटच्या कसोटी सामन्यात एकूण 4 बळी घेतले. 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. इंग्लंडकडे आता १-० अशी आघाडी आहे. जेम्स अँडरसनची कारकीर्द अप्रतिम होती. यात पुनरावृत्ती नाही. पण असे असतानाही त्याच्या नावावर एक लाजिरवाणा किंवा विचित्र विक्रम झाला.
मास्टर ब्लास्टर सचीनने जेम्स अँडरसनला दिल्या शुभेच्छा
Hey Jimmy! You've bowled the fans over with that incredible 22-year spell. Here's a little wish as you bid goodbye. It has been a joy to watch you bowl – with that action, speed, accuracy, swing and fitness. You've inspired generations with your game. Wish you a wonderful life… pic.twitter.com/ETp2e6qIQ1 — Sachin Tendulkar (@sachin_rt) July 12, 2024
जेम्स अँडरसनला सचिनने खासशैलीत दिल्या शुभेच्छा
जेम्स अँडरसनने निवृत्ती घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या ‘जुन्या प्रतिस्पर्ध्याचे’ कौतुक केले. त्याने अँडरसनचे कौतुक करताना, हे जिमी ‘जिमी, तू तुझ्या २२ वर्षांच्या शानदार स्पेलने क्रीडाप्रेमींना मंत्रमुग्ध केलेस. तू दोन दशके आपल्या चाहत्यांना आपल्या गोलंदाजीने खूश केलेस. तुझी गोलंदाजी पाहण्याचा आनंद मला मिळाला. तुझ्यामुळे अनेक पिढ्या या प्रेरित झाल्या त्यांना या खेळाचे आकर्षण वाटले ही तुझी मोठी कमाल आहे. तू केलेले काम मोठे आहे. आता तू आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली आहेस याबद्दल तुझे खूप शुभेच्छा. तू तुझ्या जीवनातील नवीन इनिंगची सुरुवात करीत आहेस आपल्या कुटुंबाला आता तू वेळ देणार आहेत. तू असेच पुढे चालले पाहिजेस.
सचिन तेंडुलकरने केलेल्या धावांपेक्षा अँडरसनने जास्त धावा
सचिन तेंडुलकरने आपल्या कसोटी कारकिर्दीत खेळलेल्या एकूण 200 कसोटी सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने फलंदाजी करत 15921 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 51 शतके आणि 68 अर्धशतकेही केली आहेत. तर जेम्स अँडरसन (41 वर्षे) याने 188 कसोटीत एकूण 704 विकेट्स घेतल्या आहेत आणि 32 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. पण त्याने या काळात 18625 धावाही केल्या. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत तितक्या धावा केल्या नाहीत. अँडरसनने त्यापेक्षा जास्त खर्च केला. अँडरसनने (41 वर्षे) 188 कसोटीत एकूण 704 विकेट घेतल्या आहेत आणि 32 वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. लॉर्ड्सवरील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला.
मास्टर ब्लास्टर काय म्हटलाय नेमकं पाहा…….
मास्टर ब्लास्टर सचीनने ‘X’ वर लिहिले, ‘जिमी, तू तुझ्या २२ वर्षांच्या शानदार स्पेलने क्रीडाप्रेमींना मंत्रमुग्ध केलेस. ‘ त्याने लिहिले, ‘तुला गोलंदाजी करताना पाहून आनंद झाला. तू गोलंदाजी करताना वेग, अचूकता, स्विंग आणि फिटनेस अप्रतिम होता. तुम्ही तुमच्या खेळाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. मास्ट ब्ला, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या स्पेलसाठी – कुटुंबासोबत वेळ घालवताना तुम्हाला चांगले आरोग्य आणि आनंदाने भरलेल्या अद्भुत जीवनाच्या शुभेच्छा देतो.’






