'या' संरक्षण कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेय 1,990 कोटींचे कंत्राट, शेअरवर दिसणार परिणाम!
२०२४ या वर्षीच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात काहीशी घसरण पाहायला मिळाली आहे. मात्र, असे असले तरी मुंबईच्या माझगांव डॉक शिपबिल्डर्सला पाणबुड्यांसाठी एअर-इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्लग तयार करण्यासाठी 1,990 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे आता माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
2,867 कोटी रुपयांच्या दोन ऑर्डर
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण मंत्रालयाने 2,867 कोटी रुपयांच्या दोन करारांवर स्वाक्षरी केली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीला एका कराराअंतर्गत एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) बांधण्यासाठी आणि देशाच्या पाणबुड्यांवर त्यांचे एकत्रीकरण करण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
याशिवाय 877 कोटी रुपयांचा दुसरा करार हा फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपसोबत करण्यात आला आहे. हे डीआरडीओ-निर्मित इलेक्ट्रॉनिक हेवी वेट टॉर्पेडोज दुसऱ्या कलवरी-श्रेणीच्या पाणबुड्यांमध्ये बसवले जाणार आहेत. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत 30 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे या दोन्ही करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहे, असेही या निवेदनात सरकारकडून सांगण्यात आले आहे.
आता 5000 रुपयांची नोट चलनात येणार? काय आहे आरबीआयची घोषणा?
शक्तीशाली पाणबुड्यांची निर्मिती होणार
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एआयपी तंत्रज्ञान तयार केले आहे. पाणबुड्यांमध्ये एआयपी प्लग बसवल्याने त्यांची ताकद वाढणार आहे. तसेच देशात त्यांचे बांधकाम केल्यामुळे स्वावलंबी भारताच्या उपक्रमालाही हातभार लागणार आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे तीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तर पाणबुड्यांमध्ये ईएचडब्लूटीचे एकत्रीकरण हा डीआरडीओ, भारतीय नौदल आणि फ्रान्सचा संयुक्त प्रयत्न असणार आहे. यामुळे भारतीय नौदलाच्या कलवरी-श्रेणीच्या पाणबुड्यांची आक्रमण क्षमता वाढणार आहे.
LPG, PF, UPI व्यक्तीगत फायनान्समध्ये, बँकिंग क्षेत्रातही 1 जानेवारीपासून मोठे बदल
कशी आहे शेअरची स्थिती
माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्स आज (ता.३१) 1.84 टक्क्यांच्या घसरणीसह 2,266.25 रुपयांवर बंद झाले आहे. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात या किमतीत माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक बंद करणे, या वर्षी 98.46 टक्के वाढ दर्शवते. याआधी शुक्रवारी (ता.२७) कंपनीने 2:1 च्या प्रमाणात स्टॉक विभाजनाची घोषणा केली होती. कंपनीच्या स्टॉकने 5-दिवस, 10-दिवस, 20-दिवस, 30-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी व्यापार केला, तर 0-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या साध्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)