• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Mla Nitesh Rane That Government Didnt Arrested Me I Surrendered To Police Nrsr

‘मला अजुनपर्यंत हे सरकार अटक करू शकलेलं नाही, मी स्वत: सरेंडर झालो’ – जामीन मिळाल्यावर सावंतवाडीत पोहोचताच नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र

मला संरक्षण (Security) असताना देखील स्वत: सरेंडर (Surrender) झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकार मला अजुनपर्यंत अटक (Arrest) करू शकलेलं नाही. मी स्वत: सरेंडर झालो आणि त्यानंतर मला दोनच दिवसांची पीसी दिली गेली आणि मी एमसीआर मध्ये होतो.” असं नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सांगितलं आहे.

  • By साधना
Updated On: Feb 10, 2022 | 04:57 PM
‘मला अजुनपर्यंत हे सरकार अटक करू शकलेलं नाही, मी स्वत: सरेंडर झालो’ – जामीन मिळाल्यावर सावंतवाडीत पोहोचताच नितेश राणेंनी सोडलं टीकास्त्र
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सावंतवाडी : “मला संरक्षण असताना देखील स्वत: सरेंडर (Nites Rane Surrender) झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकार मला अजुनपर्यंत अटक (Arrest) करू शकलेलं नाही. मी स्वत: सरेंडर झालो.” असं वक्तव्य नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलं आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांना बुधवारी जामीन मंजूर झाला आणि त्यांनतर आज सकाळी त्यांना कोल्हापुरातील (Kolhapur) रुग्णालयातून डिस्चार्जही दिला गेला. ते आज दुपारी सावंतवाडीत (Sawantwadi) पोहचले असताना त्यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला.

नितेश राणे म्हणाले, “पहिल्या दिवसापासुन म्हणजे १८ डिसेंबर ज्या दिवशी ही घटना झाली, ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्या तपासकार्यात मी सतात्याने मदत करत होतो आणि तशीच मदत या पुढेही जिथे जिथे पोलीस खात्याला तपास कार्यात माझी मदत लागेल. मला न्यायालयाने ज्या अटी शर्थी लावून दिलेल्या आहेत. त्या सगळ्या अटी शर्थींचं पालन करून आणि चौकशी अधिकारी जेव्हा जेव्हा मला बोलावतील, तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे जाऊन हजेरी लावून त्या सगळ्या तपास कार्यात मदत मी कालही केली होती, आजही करणार आणि पुढेही करणार आहे.

[read_also content=”क्रिप्टोकरन्सी आर्थिक स्थिरतेसाठी घातक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिला धोक्याचा इशारा https://www.navarashtra.com/india/rbi-governor-shakitkant-das-said-that-cryptocurrency-is-dangerous-for-economic-stability-nrsr-235872.html”]

ते पुढे म्हणाले की,“मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलेलो नव्हतो. मला जेव्हा जेव्हा फोन आले, जेव्हा जेव्हा माझ्याशी संपर्क केला गेला. तेव्हा तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो होतो, जात होतो, बोलत होतो तेव्हा माध्यमांनी देखील ते दाखवलं आहे. कुठ्ल्याही तपासकार्यात मी कधी अडथळे आणले नाहीत, कुठली माहिती लपवली नाही. मला जी नोटीस मिळाली, जे काही प्रश्न विचारले ती सगळी माहिती जेवढी माझ्याकडे होती ती सर्व माहिती मी देत होतो. यापुढेही मी देणार आहे.”

तसेच, “एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी विधीमंडळाचा एक सदस्य आहे. दोन वेळा निवडून आलेला एक लोकप्रतिनिधी आहे. जबाबदारीने वागणं, हे माझ्याकडून अपेक्षित असतं. जेव्हा जेव्हा कोणीही माझा मतदार किंवा या तपासकार्यात असो, माझं सहकार्य मागतात किंवा मागत होते, तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सहकार्य करत होतो. पळण्याचा  विषय कधी आला नाही. मला पोलिसांनी अटक करण्याची पण गरज भासली नाही, ज्या दिवशी मी सरेंडर झालो. आपणास माहिती असेल की आणखी चार दिवस मला सर्वोच्च न्यायालयाचं संरक्षण होतं. पण तरीही त्या एक दिवसाअगोदर जे काही न्यायालयाच्या बाहेर घडलं. ज्या पद्धतीने माझी गाडी अडवली गेली आणि त्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा जो काही प्रयत्न सुरू झाला. त्याचबरोबर मी हा देखील विचार केला, की सिंधुदुर्गच्या जनतेला माझ्यामुळे कुठला त्रास नको. कायदा आणि सुव्यवस्था कुठेही खराब माझ्यामुळे व्हायला नको. म्हणून मी माझ्या कुटुंबाशी चर्चा करून, माझ्या वकिलांशी चर्चा करून मी स्वत: सरेंडर झालो. मला संरक्षण असताना देखील स्वत: सरेंडर झालो, मला अटक केलेली नाही. हे सरकार मला अजुनपर्यंत अटक करू शकलेलं नाही. मी स्वत: सरेंडर झालो आणि त्यानंतर मला दोनच दिवसांची पीसी दिली गेली आणि मी एमसीआर मध्ये होतो.” असंही नितेश राणे यांनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर “ माझ्या तब्यतीबद्दल जे काही विषय सुरू होते. मला आश्चर्य असं वाटतं, की मला जो काही आधी त्रास होतोय याच्याही नंतर मी कोल्हापुरच्या रुग्णालयातून सुट्टी घेतली असली तरी, यानंतर मी माझ्या वैद्यकीय रुग्णालयात जाणार आहे, तिथे मी दोन दिवस रुग्णालयात दाखल होणार आहे, त्यानंतर काही उपचारांसाठी मी मुंबईला जाणार आहे. मला पाठीचा, मणक्याचा त्रास अगोदरही होता. एमआरआय रिपोर्ट देखील डॉक्टरांनी बघितले आणि आता तो वाढलेला आहे. रक्तदाबाचा त्रास आहे, माझी शुगर लो होते आहे. आता हा सगळा जो काही विषय आहे, जे माझ्यावर आरोप होत होते की, हे राजकीय आजार आहे. न्यायालयीन कोठडी होती म्हणून याने राजकीय आजार काढले आहेत. चला आपण एक मानू की नितेश राणे खोटं बोलतोय, त्याला तुरुंगात जायचं नाही. पण माझी जी वैद्यकीय तपासणी व्हायची, जे काय माझे रिपोर्ट काढले होते ते देखील काही खोटे होते का? कोणाच्याही पुराव्याशिवाय अशाप्रकारे प्रश्न उपस्थित करणे, हे किती नैतिकतेमध्ये बसतं, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे साजेसे आहे का? हा विचारही थोडा आपण करायला हवा.” असंही नितेश राणे यांनी बोलून दाखवलं.

“ प्रश्न विचारायचे असतील तर आम्ही देखील खूप विचारू शकतो. आम्ही देखील हे विचारलं तर चालेल का? की जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, जेव्हा ईडीच्या कारवाया सुरू होतात, तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात. असं आम्ही विचारलं तर चालेल का? लता दीदींच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री स्वत: गेले होते असं मी ऐकलं. तिथे बेल्ट वगैरे काहीच नव्हतं घातलेलं. मग अधिवेशनाच्या काळात नेमकं त्याचवेळी मुख्यमंत्री आजारी का पडतात ? महाविकास आघाडीची जी नेतेमंडळी आहेत, त्यांच्यावर जेव्हा ईडीच्या कारवाई सुरू होतात तेव्हाच त्यांच्यासोबत १४ दिवस कोरोना त्यांना कसा होतो? हे प्रश्न आम्ही विचारले तर चालतील का? कोणाच्या तब्यतेबद्दल, आरोग्य व्यवस्थेवर असा प्रश्न निर्माण करणं, हे नैतिकतेच्या चौकटीत बसतं का? याबद्दल सगळ्यांनी विचार करायला हवां, असं माझं तरी मत आहे.” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

Web Title: Mla nitesh rane that government didnt arrested me i surrendered to police nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2022 | 04:56 PM

Topics:  

  • Nitesh Rane
  • Sawantwadi

संबंधित बातम्या

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे
1

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
2

आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

भाजपाच्या धमक्यांना भिक घालत नाही, अंगावर आले तर आम्ही त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Feb 17, 2026 | 07:03 PM
”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

”संपूर्ण देशातील चाहते माझ्यासोबत..”, Rajpal Yadav तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया समोर

Feb 17, 2026 | 07:00 PM
Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Mumbai Coastal Road: मुंबईतील नाना-नानी पार्क पडणार हातोडा? कोस्टल रोड बांधण्यासाठी किती झाडे तोडणार?

Feb 17, 2026 | 06:54 PM
Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Satara News: ६५ व्या वर्षी निवृत्ती नाही…! रिक्षा चालवणाऱ्या मंगला आजींची साताऱ्यात चर्चा

Feb 17, 2026 | 06:45 PM
Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Feb 17, 2026 | 06:40 PM
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मिळून बनवणार शक्तिशाली हेलिकॉप्टर; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

Feb 17, 2026 | 06:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.