उत्तर प्रदेश : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहे. आता राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी अयोध्येत केली. ‘राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा यावेळी राज ठाकरेंविरोधात देण्यात आल्या. दरम्यान, राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या कृत्यांविषयी मी आधीपासून बोलतोय आणि त्यांची निंदा करतोय, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलंय. ते टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधींसोबत बोलत होते. राज ठाकरेंनी माफी मागितली, तर उत्तर भारतीय त्यांना माफही करतील, असंही ते म्हणाले आहेत. राज ठाकरेंच्या माफीच्या मागणीवर कायम राहत भाजप खासदार यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. दिल्लीतून फोन आले तरी आता आंदोलन मागे घेणं शक्य नाही, असंही ते म्हणाले आहेत.
[read_also content=”‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ चा नवा रेकॉर्ड, आशियातील सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर चित्रपटाचे पोस्टर https://www.navarashtra.com/movies/prasad-oak-shared-post-about-biggest-hoarding-in-asia-of-dharmveer-movie-nrsr-277994.html”]
mp brijbhushan singh slams raj thackeray by saying he is a rat on ayodhya tour nrps