Mulshi Gram Panchayat Election 2026: मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट
पिरंगुट : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली आहे. त्यानंतर आता पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील ९३ पैकी ४२ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज सुरू होईल. (Gram Panchayat Election 2026)
मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींची मुदत ८फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या काळात टप्प्याटप्प्याने संपत आहेत. त्यातील नियमांनुसार ग्रामपंचयातींचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच निवडणुका घेऊन नवीन ग्रामपंचायतींवर कार्यकरिणी आस्तित्त्वात येणे आवश्यक असते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंद्रकांत वाघमारे यांनी ६ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. यामुळे आता पुढील सहा महिने या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती असणार आहे.
प्रशासकीय अडचणींचा अडथळा सदर ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर लोकशाही प्रक्रियेनुसार निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासकीय कारणांमुळे सध्याच्या परिस्थितीत निवडणुका घेणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा विचार करून ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज विस्कळीत होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुदत: ६ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही प्रशासकीय नियुक्ती असेल.
व्याप्ती: मुळशी तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
कारभार: जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत नेमलेले प्रशासक या गावांच्या विकासकामांची आणि दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळतील. (Satara Gram panchayat )
निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुकांची प्रतीक्षा आता आणखी वाढली असून, आगामी काळात निवडणुका कधी जाहीर होतात, याकडे तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर ६ प्रशासकांची नियुक्ती; कोणाकडे सोपवली कोणत्या गावाची धुरा? पाहा संपूर्ण यादी
मुळशी तालुक्यातील मुदत संपलेल्या ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिल्यानंतर, आता ग्रामपंचायतनिहाय जबाबदारी सोपवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. विस्तार अधिकाऱ्यांकडे विविध गटांनुसार या ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Ajit Pawar Plane Crash Conspiracy: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार की वाढणार;
१. विस्तार अधिकारी अजित साकोरे
यांच्याकडे एकूण ११ ग्रामपंचायतींची जबाबदारी असेल:
लवळे, भोईनी, कुळे, दखणे, मुगावडे, नांदगाव, भरे, अकोले, शेरे, चांदे आणि हिंजवडी.
२. विस्तार अधिकारी महादेव चव्हाण
यांच्याकडे ५ महत्त्वाच्या ग्रामपंचायतींचा कार्यभार सोपवण्यात आला आहे:
घोटावडे, कासारसाई, नांदे, माण आणि मारुंजी.
३. विस्तार अधिकारी सोमा खैरे
यांच्याकडे सर्वाधिक ८ ग्रामपंचायतींची जबाबदारी असेल:
उरवडे, कासार आंबोली, भालगुडी, पौड, भूकुम, मुठा, रिहे आणि जांबे.
४. प्रशासक प्रतिभा राऊत
यांच्याकडे ८ ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार असेल:
कोळावडे, आंदगाव, चिंचवड, आंदेशे, खेचरे, चाले, बोतरवाडी आणि मांदेडे.
५. प्रशासक शरद बेलदार
यांच्याकडे ३ ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे:
साठेसाई, हाडशी आणि वाळेण.
६. प्रशासक सुवर्णा मेंगडे
यांच्याकडे ७ ग्रामपंचायतींचा कार्यभार असेल:
नाणेगाव, चिखलगाव, आंबेगाव, कातरखडक, खांबोली, मुलखेड आणि नेरे.






