MS Dhoni ने अनंतला राधिकाची घ्यायला सांगितलीये काळजी; इन्स्टावर पोस्ट करीत राधिका-अनंतला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा
Mahendra Singh Dhoni wishes Radhika-Anant : आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती असलेले मुकेश अंबानी यांच्या मुलाचे म्हणजेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा देशातील सर्वात हायव्होल्टेज चर्चेचा विषय होता. या लग्नसोहळ्याला जगभरातील स्टार्सने हजेरी लावली होती. भारतातील बॉलिवूड स्टारपासून साऊथचे अनेक सिनेस्टारसह मोठे दिग्गज क्रिकेटर्स या लग्नाला उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक उद्योगपती, सिनेस्टार, विविध खेळाडूंनी या लग्नाला हजेरी लावत अनंत-राधिकाला शुभेच्छा दिल्या होत्या.
एमएस धोनीच्या अनंत-राधिकाला खास शैलीत शुभेच्छा
देशाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीसुद्धा या लग्नाला उपस्थित होता. कधीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नसणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने अनंत-राधिका यांना लग्नाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली आहे. त्याने अनंतला राधिकाची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर तुम्हा दोघांचे वैवाहिक जीवन आनंदाने, हास्याने आणि साहसाने भरलेले असावे, अशा शुभेच्छा माहीने राधिका-अनंत शुभेच्छा दिल्या आहेत.
MS Dhoni ने दिल्या अनंत-राधिकाला शुभेच्छा
काय म्हटलेय पाहा महेंद्रसिंह धोनीने….
राधिका, तुझे ते तेजस्वी हास्य कधीही मावळू दे! अनंत, तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येकाला दाखवता त्याच प्रेम आणि दयाळूपणाने कृपया राधिकाचे पालनपोषण आणि काळजी घ्या. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने, हास्याने आणि साहसाने भरले जावो. अभिनंदन आणि लवकरच भेटू! गाणे विरेन काकांसाठी आहे.
मुंबईत मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा
12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न मुंबईत मोठ्या थाटामाटात पार पडले. या शाही जोडप्याच्या लग्नाला प्रसिद्ध व्यक्ती आणि ज्यांच्याशी अंबानी कुटुंबाचे खास नाते आहे असे सर्व पाहुणे उपस्थित झाले होते. या लग्नात शाहरुख खान, महेंद्रसिंग धोनी, सलमान खानसह अनेक व्हीआयपी पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यासोबतच ज्या व्यक्तीने अनंतचा लहानपणापासून सांभाळ केला होता. तेही या सोहळ्यात सहभागी झाले होते.
या व्यक्तीचे अंबानी कुटुंबाशी खास नाते आहे
अनंत अंबानींच्या लग्नात नानी ललिता डिसिल्वा यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. ललिताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून लोकांनी ओळखले की सेलिब्रिटींच्या जगात तिचा चेहरा नवीन नाही. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ललिता डिसिल्वा अनंत अंबानींना मिठी मारताना दिसत आहे. तिने आणखी काही फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांसोबत दिसत आहे.