मुंबई : मंगळवारी उशिरा रात्री केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर बुधवारी त्यांनी पत्रपरिषदेतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तथापि न्यायालयाच्या अटींमुळे राणे यांनी संयमित भाषेचा वापर करीत मुख्यमंत्री ठाकरे यांचा ‘आदरार्थी’ असा उल्लेख करीत त्यांच्यावर टीका केली.
ज्या माणसाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्सवाबाबत माहिती नसेल, तर संताप येणार येणार नाही का? आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवनाबद्दल काहीतरी वक्तव्य केले होते. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असे ते बोलले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह्य भाषा वापरली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबतही आक्षेपार्ह भाषेचा उपयोगही त्यांनी केला, आला. तो गुन्हा नाही का, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.
राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली. ज्या माणसाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या उत्सवाबाबत माहिती नसेल, तर संताप येणार येणार नाही का? आमदार प्रसाद लाड यांनी सेना भवनाबद्दल काहीतरी वक्तव्य केले होते. आमच्या महिलांवर हात टाकला तर, असे ते बोलले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबतही आक्षेपार्ह भाषेचा उपयोगही त्यांनी केला, आला. तो गुन्हा नाही का, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
पत्रपरिषदेत राणेंनी ठाकरेंनी केलेल्या विधानांचे वाचन केले. त्यामध्ये, अमित शहांना निर्लज्जपणाने हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. तर, योगी आदित्यनाथ यांना ढोंगी म्हणत चप्पलेने मारावे, असे शब्द उद्धव यांनी वापरले होते. ज्याला मुख्यमंत्री केले त्याचा सुसंस्कृतपणा बघा असा टोमणाही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्देशून हाणला. एवढं चांगलं बोलणाऱ्याला त्यांनी मुख्यमंत्री केले तर चुकीचे केले, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
अनिल परब यांच्याकडून जे काही करण्यात आले त्याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत. जन आशीर्वाद यात्रेचा प्रतिसाद पाहून सरकार घाबरल्याने त्यांनी यात्रेला अपशकून करण्यासाठी ही कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
राणे यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे, ठाकरे यांनी राणेंच्या जुहू येथील बंगल्यासमोर आंदोलन करणाऱ्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पाठ थोपटून राणेंना डिवचण्याचाही प्रयत्न केला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा राणेंच्या बंगल्यासमोर राडाही झाला होता.
[blockquote content=”अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतो की पकडा त्याला. दिशा सालियान प्रकरणात कोण मंत्री उपस्थित होता? त्याचा छडा का लागत नाही. पूजा चव्हाण प्रकरणातही तेच झाले. आता त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत मागे हटणार नाही. त्या मंत्र्याविरोधात कोर्टात जाणार. ज्यांनी दिशा सालियानची हत्या केली, ते आत जाईपर्यंत आता स्वस्थ बसणार नाही. फार सभ्यपणाचा आव आणणाऱ्यांच्या करामती जनतेसमोर आणल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही. ” pic=”” name=”- नारायण राणे, केंद्रीय एमएसई मंत्री”]






