Gadgets 360
व्हॅलेंटाईन वीक उद्यापासून सुरु होणार आहे. यानिमित्त आता ॲपलने आयफोन यूजर्सना एक मोठी भेट दिली आहे. तुम्हीही ॲपल युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. ॲपलने ग्रीटिंग्ज कार्ड बनवण्यासाठी आणि इन्वाइट्स तयार करण्यासाठी एक नवीन ॲप लाँच केले आहे. या ॲपद्वारे, युजर्स त्यांच्या आयफोनवरून सहजपणे कस्टम इन्वाइट तयार करू शकतील आणि त्यांच्या मित्रांना किंवा प्रियजनांना ते पाठवू शकतील.
ॲपलने iOS 18 च्या नवीनतम अपडेटसह हे फिचर आणले आहे. कंपनीने गेल्या वर्षी झालेल्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये (WWDC) या फीचरची घोषणा केली होती. ॲप युजर्सना इन्विटेशन शेअर करणे, कस्टम कार्ड क्रिएट करणे, इव्हेंट्समध्ये RSVP करण्यास आणि अल्बम शेअर करण्यास मदत करते.
तथापि, ॲपलचे हे फिचर iCloud+ चे सब्सक्रिप्शन घेणाऱ्या युजर्ससाठी उपलब्ध असेल. हे फिचर काही काळापूर्वी आयफोनसाठी जारी केलेल्या iOS 18.3 बीटा युजर्ससाठी आणले गेले होते. आता ते जागतिक स्तरावर आणले जात होते. कंपनीने आपल्या अधिकृत न्यूजरूमवरून ही माहिती दिली आहे. ॲपल आयडी वापरून, युजर्स त्यांच्या आयफोनवर तसेच वेबवर या नवीन इन्वाइट ॲपमध्ये प्रवेश करण्यास एक्सेस करू शकतील.
Smartphone Tips: तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित आहेत की नाही? असे करा चेक
AI ने सुसज्ज वैशिष्ट्ये
ॲपलचे हे नवीन टूल एआय फीचरने सुसज्ज आहे आणि यामध्ये युजरच्या आयफोनमध्ये किंवा गॅलरीमध्ये उपस्थित असलेला कोणताही फोटो, व्हिडिओ वापरून आमंत्रण तयार केले जाऊ शकते. तसेच, तुम्ही तुमचे मित्र, कुटुंबातील सदस्य आणि प्रियजनांना इन्वाइट करू शकता. या इन्वाइटला चेक करण्यासाठी, युजर्सना ॲपल डिव्हाइसमध्ये iCloud+ सब्सक्रिप्शनची आवश्यकता नाही. तथापि, ते तयार करण्यासाठी, iCloud+ चे सब्सक्रिप्शन घेणे अनिवार्य आहे. आयफोन युजर्स प्रत्येक इन्वाइटसोबत फोटो, व्हिडिओ किंवा समर्पित अल्बम शेअर करू शकतील. याशिवाय, तुम्ही ॲपल म्युझिक वापरून इन्वाइट्समध्ये म्यूजिक देखील ॲड करू शकतात.
Apple Care+ सब्सक्रिप्शन झाले महाग
ॲपलने iPhone युजर्ससाठी AppleCare+ सब्सक्रिप्शन योजना महाग केली आहे. ॲपलने आता iPhone 16 साठी $7.99 (अंदाजे रु. 696) प्रति महिना योजनेची किंमत $8.49 (अंदाजे रु. 740) प्रति महिना वाढवली आहे. $9.99 (अंदाजे रु. 840) चा iPhone 16 Pro चा मंथली प्लॅन आता $10.49 म्हणजेच अंदाजे रु. 914 प्रति महिना इतका वाढवला गेला आहे.