(फोटो सौजन्य: Pinterest)
आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन हा आपली गरज बनला आहे. रोजच्या कामात आपल्याला आपल्या स्मार्टफोनची फार मदत होते. याच्या मदतीने आपण आपली अनेक कामे सहज आणि जलद करू शकतो. बदलत्या कालानुसारच स्मार्टफोन्सच्या जगातही अनेक बदल घडून आले. पूर्वीचे फोन आणि आता मिळणारे स्मार्टफोन्स यात बराच फरक आहे.
आजकाल बहुतेक लोकांच्या हातात मोठ्या स्क्रीनचे फोन पाहायला मिळतात. पण फीचर फोनची क्रेझही काही कमी नाही. त्यांचा वापर करणारा एक विशेष ग्राहकवर्ग आहे. मात्र, तुम्हाला जगातील सर्वात लहान फोन्सविषयी माहिती आहे का? नाही तर आजच्या या लेखातून तुम्हाला याबाबत माहिती मिळेल. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लहान फोन्सबद्दल सांगणार आहोत. यातील काहींचा आकार एका अंगठ्याहून लहान आहे, तर काहींचा आकार आगपेटीएवढा आहे.
Valentine’s Day Special: ॲपलचे युजर्सना खास गिफ्ट, आता iPhone मधून करता येईल ‘हे’ काम
Zanco T1
(फोटो सौजन्य: Pinterest)
Zanco tiny t1 हा जगातील सर्वात लहान आकाराचा फोन मानला जातो. या फीचर फोनचा आकार एका अंगठ्याएवढा आहे. यात कॉल आणि मेसेज पाठवण्याची सुविधा आहे. यात OLED डिस्प्ले आणि अल्फान्यूमेरिक कीपॅड आहे. यात फक्त 200mAh बॅटरी आहे. त्याचे वजन फक्त 13 ग्रॅम आहे. हे एका चार्जिंगमध्ये 180 मिनिटांचा टॉकटाइम देऊ शकते. यात मायक्रोफोन आणि स्पीकर बसवण्यात आले आहे.
Galaxy Star
(फोटो सौजन्य: Pinterest)
जगातील सर्वात लहान फोन्सच्या यादीत Galaxy Star चे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये दोन सिम वापरता येतील. त्याचा आकार आगपेटीएवढा आहे. याच्या मदतीने फक्त कॉल आणि मेसेज सारखी कामे करता येतात. यामध्ये एक छोटा कीपॅड देण्यात आला आहे. या फोनचा आकार 67.8 x 27.8 x 12.4 सेंटीमीटर आहे.
Skyshop LBSTAR BM10
Amazon
याच्या तिसऱ्या क्रमांकावर Skyshop LBSTAR BM10 आहे. या फीचर फोनचा आकार 0.66 इंच आहे. यात 32MB रॅम आणि 32NB स्टोरेज प्रदान करण्यात आले आहे. गरज भासल्यास त्यामध्ये मेमरी कार्डही टाकता येते. विशेष म्हणजे यात कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट देखील देण्यात आले आहे.
Smartphone Tips: तुमच्या फोनमधील ॲप्स सुरक्षित आहेत की नाही? असे करा चेक
Blackzone Eco X
Sale Trending
यानंतर येतो Blackzone Eco X यात 1000mAh बॅटरी आहे. तसेच ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध आहे. फीचर फोनमध्ये 0.3 एमपी कॅमेरा सिस्टम आहे. यात 64MB स्टोरेज आणि 64MB RAM आहे. या फोनमध्ये तुम्ही फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करू शकता.
IKALL K91 Ear Fit Mobile
Amazon
शेवटी येतो IKALL K91, हा फोन त्याच्या डिझाइनमुळे अद्वितीय दिसते. जगातील सर्वात लहान फीचर फोनपैकी हे एक आहे. यात 500mAh बॅटरी आहे, जी सिंगल चार्जिंगमध्ये चांगला बॅकअप देते. यात 2G नेटवर्क उपलब्ध आहे.