सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणं जसं अनेकांना आवडतं तसंं घरबसल्या ओटीटी प्लॅटफार्मवर चित्रपट, वेबसिरिज पाहणंही अनेकांना आवडतं. तर मग ओटीटीची आवड असणाऱ्यांना आता या विकेंडमध्ये धमाकेदार चित्रपट आणि वेबसिरिद बघता येणार आहे. चित्रपट रसिकांसाठी, मनोज बाजपेयीचा ‘सायलेन्स 2’ आणि यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ रिलीज (OTT Release this week) झाला आहे. तर मग जाणून घ्या आणखी कोणते कोणते चित्रपट आणि वेबसिरीज या विकेंडला तुम्ही पाहू शकता.
[read_also content=”चित्रपटसृष्टी का सोडली? इतक्या वर्षांनंतर अभिनेता इमरान खाननं सांगितलं कारण! https://www.navarashtra.com/movies/actor-imran-khan-reveales-thatg-why-he-left-bollywood-nrps-525533.html”]
आर्टिकल 370
यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. दीड महिन्यांपूर्वी तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तुम्ही ते OTT वर पाहू शकता. चित्रपटाची कथा काश्मीरवर आधारित आहे.
सी यू इन अदर लाइफ
डिस्ने प्लस हॉटस्टारवर ‘सी यू इन अदर लाइफ’ ही वेब सिरीज रिलीज झाली आहे, जी स्पॅनिश क्राईम ड्रामा आहे. एका सत्य घटनेवर आधारित ही मालिका आहे.
सायलेन्स 2
मनोज बाजपेयी आणि प्राची देसाई यांचा क्राईम थ्रिलर ‘सायलेन्स 2’ ZEE5 वर रिलीज झाला आहे. ही कथा एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीची हत्या करणाऱ्या खुनीची आहे. मनोज तिच्यापर्यंत कसा पोहोचू शकतो हे दाखवण्यात आले आहे.
सायरन
डिस्ने प्लस हॉइस्टारवर ‘सायरन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा एका रुग्णवाहिका चालकाची आहे जो गुन्हेगार बनतो. 14 वर्षे तुरुंगवास भोगतो आणि सुटकेची वाट पाहतो.