Panchat Jokes Teacher Scold Chaman As He Get Less Marks In Exams But Still He Cant Stop His Laugh Read What Happened Funny Jokes In Marathi
पांचट Jokes : मास्तरांनी काढली चमनची निर्लज्जता पण चमन काही केल्या हसायचा थांबेनाच… कारण वाचाल तर तुम्हीही हसाल
Marathi Jokes : अरे जरा हस की भावा! आयुष्याच्या वळवणावर अनेक गोष्टी येतील पण शाळेचे दिवस काही पुन्हा येणार नाहीत. मास्तरांचा राग पण त्या रागावर तेल ओतणारा चमनचा पराक्रम तुम्हाला नक्कीच हसवेल. एकदा वाचा तरी हे मराठी विनोद
शाळेच्या मागे असलेल्या नदीत मुख्याध्यापक बुडत होते.
एका विद्यार्थ्याने हे पाहिले आणि तो शाळेकडे धावत गेला
धावत धावत तो “उद्या सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे” असा जयघोष करत निघाला…
डॉक्टर – तुला चष्मा कोणासाठी बनवायचा आहे?
चमन – मास्तरांसाठी
डॉक्टर – पण का?
चमन – कारण त्यांना नेहमी मला गाढवच दिसतो…
सायन्स टीचर – तू झोपत आहेस का?
चमन – नाही बाई ते गुरुत्वाकर्षणामुळे माझं डोकं खाकी पडत आहे…
शिक्षक – ४ आणि ४ किती होतात?
चमन – १० होतात
शिक्षक – ८ होतात… बावळट
चमन – मी दयाळू आहे सर… मी स्वतःचे २ टाकले आहेत
एका शिक्षकाने चमनला विचारले – शाळा काय आहे?
चमन उत्तर देत म्हणाला – शाळा ही अशी जागा आहे जिथे आपल्या वडिलांना लुटले जाते आणि आपल्याला कुटले जाते…
मुख्याध्यापक पालकांना – तुम्हाला शाळेतून सगळं काही खरेदी करावं लागेल.
जसे… नोटबुक, शाळेचा गणवेश, बूट, मोजे, बेल्ट, बॅग…
पालक – ठीक आहे… आणि ट्युशन?
मुख्याध्यापक – हा हा! त्यासाठी, तुम्हाला बाहेर क्लासेस लावावे लागतील…
सर: सांग चमन तुझा जन्म कुठे झाला?
चमन: औरंगाबाद
सर: चल त्याची स्पेलिंग सांग बरं…
चमन थोडा विचार करतो आणि
म्हणतो – नाही, नाही…. माझा जन्म पुण्यात झाला….
सर – किती निर्लज्ज आहेस तु चमन?
तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले
आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा?
चमन – सर , मी हसत आहे कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाणं लिहून आलो होतो फक्त,
तरी मला ५ गुण कुठून मिळाले….
शिक्षक – झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस..?
चमन – कारण कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चालले आहे ते….
चमन लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोहचला.
इंग्रजीचे सर ओरडत म्हणाले – “व्हाय आर यू लेट?
मन्या म्हणाला – सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला, म्हणून ऊशीर झाला.
सर पुन्हा ओरडत म्हणाले – टॉक इन इंग्लिश!…
हजरजबाबी मन्याने म्हटले – सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड.
काऊज हसबण्ड केम…ही मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!
Web Title: Panchat jokes teacher scold chaman as he get less marks in exams but still he cant stop his laugh read what happened funny jokes in marathi