6 महिन्यांत 181 टक्के परतावा; 52 आठवड्यांच्या उच्च पातळीला पोहोचलाय पेटीएमचा शेअर!
पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सचे शेअर्समध्ये गेल्या काही दिवसात सातत्याने तेजी नोंदवत आहेत. शुक्रवारी (ता.२२) ट्रेडिंग दरम्यान कंपनीचे शेअर्स जवळपास 7 टक्क्यांनी वाढले आणि 897.90 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. पाच दिवसांत शेअर्स 19 टक्क्यांनी वधारला आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म बर्नस्टीन या शेअर्सवर सकारात्मक असून, त्यात खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.
किती आहे लक्ष्य किंमत?
आपले ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग कायम ठेवत असताना, बर्नस्टीनने पेटीएमसाठी आपली लक्ष्य किंमत 750 वरून 1,000 रुपये प्रति शेअर वाढवली आहे. ब्रोकरेजला अपेक्षा आहे की पेटीएम आपल्या कर्ज ऑपरेशन्सचा विस्तार करेल आणि पेआउट मार्जिन सुधारेल. संभाव्यत: बेस-केस कमाई प्रति शेअर (ईपीएस) अंदाज दुप्पट करेल. ब्रोकरेजने पेमेंट मार्जिनमधील सुधारणा, नियामक बदल आणि कंपनीच्या कर्ज धोरणासह पेटीएमच्या नफ्याला चालना देणाऱ्या अनेक विकासाच्या पैलूवर प्रकाश टाकला आहे.
पेटीएमच्या शेअर्सची किंमत किती?
पेटीएमचे शेअर्स आज 6.2 टक्क्यांनी वाढून, 897.90 रुपयांवर पोहोचले. त्यामुळे या शेअरमध्ये सलग पाचव्या सत्रातील तेजी नोंदवली गेली. या सत्रांमध्ये शेअर 19 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या वर्षी 7 टक्क्यांहून अधिक घसरण होऊनही 2024 मध्ये शेअर आतापर्यंत 41 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. नोव्हेंबर महिना पेटीएमसाठी खूप मजबूत राहिला आहे. आतापर्यंत शेअरमध्ये 16 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. पेटीएम हा 2021 च्या आयपीओबद्दल सर्वाधिक चर्चेत होता. कंपनीने 2150 रुपयांच्या किंमत पट्ट्यावर आयपीओ लॉन्च केला होता. तेव्हापासून शेअर सुमारे 60 टक्क्यांनी घसरला आहे.
बिटकॉइन घोटाळा प्रकरणी गौरव मेहतांच्या घरावर ईडीचा छापा; सुप्रिया सुळेंसह नाना पटोलेंची चौकशी होणार?
काय करते ही कंपनी?
पेटीएम एक भारतीय शॉपिंग वेबसाईट आहे. कंपनीचे २०१० मध्ये उद्घाटन करण्यात आले एक भारतीय ई-कॉमर्स खरेदी साइट आहे. कंपनीची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी २०१० मध्ये केली होती. भारतात नोएडा इथे पेटीएम मुख्यालय आहे. हे हळूहळू वीज बिल, वायू बिल तसेच रिचार्जिंग आणि विविध पोर्टलच्या बिल देयका प्रदान करते. पेटीएम ने २०१२ मध्ये भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये प्रवेश केला, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि स्नॅपडील व्यवसायाची वैशिष्ट्ये आणि उत्पादने देण्यास सुरुवात केली.
पेटीएम सध्या ११ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि मोबाईल रिचार्ज, युटिलिटी बिल पेमेंट्स, ट्रॅव्हल, मूव्हीज आणि इव्हेंट बुकिंग तसेच किराणा स्टोर्स, फळे आणि भाजीपाल्याच्या दुकानांत, रेस्टॉरंट्स, पार्किंग, टोलमध्ये ऑनलाईन वापर प्रकरणे उपलब्ध आहेत.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)