‘रौद्रम रणम रुधिरम’ (RRR) या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटाने जगभरातील कमाईचे विक्रम मोडले आहेत. रविवारी RRRने 118 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यामुळे या चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडची कमाई ही तब्बल 490 कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये RRRचा समावेश झाला आहे.
RRR चित्रपट शुक्रवारी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला असून याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे आठ हजार स्क्रीनवर रिलिज झालेल्या या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट, भव्यदिव्य सिनेमॅटिक एक्सपिरिअन्स आणि एस. एस.राजमौली (S S Rajamouli) यांचे सुरेख दिगदर्शन यामुळे ‘आरआरआर’ प्रेक्षकांना (Response To RRR) सिनेमागृहात खेचून आणतोय.चित्रपटातील ज्युनियर एनटीआर (Junior NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांची केमिस्ट्री आणि अभिनय चित्रपटाचा आत्मा आहेत.
पहिला दिवस- 257.15 कोटी रुपये
दुसरा दिवस- 114.38 कोटी रुपये
तिसरा दिवस- 118.63 कोटी रुपये
एकूण- 490.16 कोटी रुपये
शुक्रवार- 20 कोटी रुपये
शनिवार- 23.75 कोटी रुपये
रविवार- 30 कोटी रुपये
एकूण- 73.75 कोटी रुपये