(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
मोनालिसा आणि अश्विनी बागल यांच्या दृष्टिकोनातून, रक्षाबंधन फक्त भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता सीमित नसून, एकमेकांप्रति असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचा आणि आपुलकीचा उत्सव आहे. हे नाते केवळ रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित न राहता, जीवनभर एकमेकांची साथ देण्याच्या वचनाने बांधलेले आहे. या खास प्रसंगी, मोनालिसा हिने अश्विनीला राखी बांधून त्यांच्या नात्याचा सन्मान केला. त्यांनी या सणाला नवीन अर्थ देत, स्त्रीशक्ती, आत्मनिर्भरता आणि आपुलकीचा संदेश दिला आहे.
“रक्षाबंधन फक्त बंधनात अडकवणारा सण नाही, तर तो एकमेकांच्या स्वातंत्र्याला, विचारांना आणि आदराला वचन देणारा उत्सव आहे. समाजातील नाती अधिक दृढ व्हावीत आणि स्त्रीशक्तीला मान्यता मिळावी,” असे त्या दोघींचे मत आहे. यातून हे दिसून येते की, परंपरागत सणही काळानुसार बदलत आहेत, आणि त्यातून नवा दृष्टिकोन देत समाजात सकारात्मक बदल घडवता येतो. मोनालिसा आणि अश्विनी यांच्या या अनोख्या रक्षाबंधन साजरी करण्याच्या पद्धतीमुळे, हा सण आता केवळ एक परंपरा न राहता, स्त्रीशक्ती आणि आत्मनिर्भरतेचा एक सुंदर आदर्श ठरला आहे.
हे देखील वाचा- रक्षाबंधनाच्या दिवशी पुरुषांना सुनावलं,महिलांना सुरक्षित वाटेल असं…अर्जुन कपूरचा व्हिडिओ चर्चेत
झाला बोभाटा’नं दिली ओळख
‘झाला बोभाटा’ या चित्रपटात मोनालिसा नायिका म्हणून झळकली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासानंतर ती भरपूर काम मिळत गेली. स्वप्नपूर्ती म्हणजे काय असतं, हे या चित्रपटामुळे तिला समजले. शून्य ओळख घेऊन ही अभिनेत्रीने या मराठीइंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले होते आणि ती प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. या चित्रपटाच्या भूमिकेसाठी विविध पुरस्कारांसह राज्य सरकारच्या पुरस्कारांत नामांकन मोनालिसाला मिळाले आहे. त्यानंतर अभिनेत्रीने भरपूर काम केले. आता लवकरच अभिनेत्री तिचे नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.