स्कॉटलंडचे नेपालसमोर 171 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
NEP vs SCO, T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३३ व्या सामन्यात नेपाळ आणि स्कॉटलंड आमनेसामने आले आहेत. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात टॉस गमावणाऱ्या स्कॉटलंडसंघाने मायकेल जोन्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ गडी गमावून १७० धावा केल्या आहेत. नेपाळ संघाला हा सामना आपल्या नावे करायचा असेल तर त्यांना १७१ धावा कराव्या लागणार आहे. नेपाळकडून सोमपाल कामीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात नेपाळ संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि स्कॉटलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. स्कॉटलंड संघाची सुरुवात चांगली झाली. जॉर्ज मुन्से आणि मायकेल जोन्स या सलामी जोडीने पहिल्या विकेट्ससाठी १० ओव्हरमध्ये ८० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर जॉर्ज मुन्से २७ धावा करून बाद झाला. त्यानंतर ब्रँडन मॅकमुलेन आणि मायकल जोन्स यांनी डाव सावरत ५० धावांची भागीदारी रचली. २५ धावा करून ब्रँडन मॅकमुलेन माघारी गेला. त्यानंतर मात्र स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मायकल जोन्सने शानदार अर्धशतक लगावून संघाला १७० पर्यंत पोहचवले. त्याने ४५ चेंडूत ७१ धावांची खेळी करून महत्वपूर्ण योगदान दिले. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यानंतर तो माघारी गेला. नेपाळकडून सोमपाल कामीने सर्वाधिक ३ विकेट्स चटकावल्या आहेत.तर नंदन यादवने २ विकेट्स घेतल्या. तसेच, कर्णधार रोहित पौडेल आणि कुशल भुर्तेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
स्कॉटलंड प्लेइंग इलेव्हन: जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रूस, मायकेल लीस्क, मॅथ्यू क्रॉस (कर्णधार), मार्क वॅट, ऑलिव्हर डेव्हिडसन, ब्रॅड व्हील, ब्रॅड करी
नेपाळ प्लेइंग इलेव्हन: कुशल भुर्तेल, आसिफ शेख (कर्णधार), रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग ऐरी, आरिफ शेख, लोकेश बाम, संदीप जोरा, गुलसन झा, सोमपाल कामी, नंदन यादव, संदीप लामिछाने






