साउथ स्टार रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्येही सक्रिय झाली आहे. काही चित्रपट तिने साईन केले आहेत. पण तिने पूर्वी काही अभिनेत्यांसोबत काम करण्यासही नकार दिला होता. पाहा कोण कोण आहे या यादीत.
[caption id="attachment_235695" align="alignnone" width="480"] साउथ स्टार रश्मिका मंदाना आता बॉलिवूडमध्येही सक्रिय झाली आहे. काही चित्रपट तिने साईन केले आहेत. पण तिने पूर्वी काही अभिनेत्यांसोबत काम करण्यासही नकार दिला होता. पाहा कोण कोण आहे या यादीत.[/caption]
[caption id="attachment_235693" align="alignnone" width="480"]
रश्मिकाचा नुकताच पुष्पा हा चित्रपट आला आहे. तो प्रचंड लोकप्रिय होतानाही दिसत आहे.[/caption]
[caption id="attachment_235692" align="alignnone" width="667"]
शाहीद कपूर
शाहिद कपूरचा 'जर्सी' हा चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबत मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. पण या चित्रपटासाठी रश्मिका मंदान्ना ही दिग्दर्शकांची पहिली पसंती होती हे फार कमी लोकांना माहीत असेल. मात्र रश्मिका मंदानाने हा चित्रपट करण्यास नकार दिला.[/caption]
[caption id="attachment_235691" align="alignnone" width="480"] 'किरिक पार्टी रिमेक' या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत रश्मिका मंदानाला साईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण रश्मिका मंदान्नाने तिच्याच जुन्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिला. ती म्हणाली की तीच पात्र पुन्हा पुन्हा करायची नाही.[/caption]
[caption id="attachment_235690" align="alignnone" width="1200"]
रणदीप हुडा
बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना अभिनेता रणदीप हुड्डा आणि रश्मिका मंदाना यांना घेऊन एक सुपरहिट चित्रपट बनवायचा होता. रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदानाने नकार दिल्यानंतर चित्रपट पुढे गेला नाही.[/caption]
[caption id="attachment_235710" align="alignnone" width="1190"] थलपथी विजय
साऊथचा 'मास्टर' चित्रपट हा सुपरस्टार थलपथी विजयच्या कारकिर्दीतील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी सर्वप्रथम रश्मिका मंदानाशी संपर्क साधला. पण इतर चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्याने ही ऑफर नाकारली.[/caption]