फोटो सौजन्य- X
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बॅंकेपैकी एक असणाऱ्या इंडियन बँकेने 300 स्थानिक बँक अधिकारी (LBO) स्केल 1 साठी भरतीप्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीसाठीची ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठीची अर्ज भरण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर आहे. 300 जांगापैकी 160 जागा तामिळनाडूसाठी, 50 जागा आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी, 40 जागा महाराष्ट्रासाठी, 35 जागा कर्नाटकात आणि 15 जागा गुजरातसाठी उपलब्ध आहेत.
इंडियन बँक रिक्रूटमेंट 2024 च्या निवड प्रक्रियेनुसार, जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांना परीक्षेला बसावे लागेल, त्यानंतर मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी करावी लागेल. उमेदवारांना लेखी परीक्षेसोबत भाषा प्राविण्य चाचणी देखील द्यावी लागेल.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी घेतलेले सर्व उमेदवार इंडियन बँक भर्ती २०२४ साठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत दिली गेली आहे.
चार टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया
अर्ज प्रक्रिया
अर्ज स्वरुप – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 2 सप्टेंबर 2024
अर्ज फी
सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 1000 आणि SC/ST/PWBD उमेदवारांसाठी रु. 175 आहे. डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.
इंडियन बँक भर्ती 2024: असा करा अर्ज
नोटीफिकेशन साठी इथे किल्क करा .