माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली. सर्वोत्कृष्ट चित्रपटापासून सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रीपर्यंत अनेक श्रेणींमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळणार हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. परंतु या पुरस्काराची घोषणा आता करण्यात आली आहे. साऊथ अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘कंतारा’ या चित्रपटामधील त्याचे काम आणि कर्तृत्व पाहून त्याला हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे.
‘कांतारा’ चित्रपटाची कथा
‘कांतारा’ चित्रपटाची कथा कर्नाटकातल्या किनारपट्टीच्या भागात घडणारी आहे. जिथे लोक जुन्या कथांवर खूप विश्वास ठेवतात. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये गावातले लोक आणि व्हिलन यांच्यातली भांडणं दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटातील सगळे क्लायमॅक्स सीन प्रेक्षकांना आवडले आहेत. या चित्रपटाला चित्रपटगृहात भरपूर प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट ब्लॉकब्लस्टर ठरला आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट कन्नड भाषेत बनवला गेलेला चित्रपट आहे. यानंतर या चित्रपटाला अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. तसेच या चित्रपटाला अभिनेत्याला मिळालेला हा पुरस्कार हा त्याच्यासाठी अभिमानाची बाब आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग देखील येणार असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हे देखील वाचा- कपिल शर्माने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनची केली घोषणा, जाणून घ्या नवीन थीम!
‘कांतारा २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘कांतारा २’ हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा मोठ्या स्थरावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ऋषभ आणि चित्रपटाच्या टीमने कांताराचे आऊटडोअर भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता फक्त पंधरा ते वीस दिवसांचे शूटिंग बाकी आहे, जे सेटवर होणार असल्याचे समजले आहे. होंबळे फिल्म्स आणि ऋषभ आता पुढच्या उन्हाळ्यात ‘कांतारा 2’ चित्रपगृहात प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कांतारा चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर 80 कोटींची कमाई केली होती. आता ‘कांतारा 2’ हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडणार आणि कमाई करणार ही निर्मात्यांसाठी उत्कंठाची बाब आहे.