डिहायड्रेशनमुळे वाढू शकतो सांधेदुखीचा त्रास, आरोग्यासंबंधित दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे
दिवसभरात किती पाणी प्यावे?
कमी पाण्याच्या सेवनामुळे आरोग्याला कोणती हानी पोहचते?
पाण्याच्या कमतरतेमुळे सांधे दुखी होते का?
दीर्घकाळ निरोगी आणि चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसभरात ३ लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये आणि इतर अनेक कारणांमुळे कमीत कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केले जाते. कमी पाणी प्याल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते. यामुळे चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येणे, मुरूम, पचनक्रिया बिघडणे, सांध्यांमध्ये वेदना वाढणे, हाडांमध्ये वेदना वाढणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. याशिवाय कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे महिलांमध्ये लघवीसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर लघवी करताना वेदना होणे, युटीआय इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
जड वस्तू उचलल्या नसतानाही किंवा चुकीच्या पद्धतीने बसलेले नसतानाही कधी अचानक कमरेत दुखणे जाणवले आहे का? बहुतेक वेळा अशा वेदनांचे कारण चुकीची देहबोली, स्नायूंवर आलेला ताण किंवा इजा असे मानले जाते; मात्र अनेकदा दुर्लक्षित राहणारे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. शरीरातील पाणी कमी झाले, तर त्याचा थेट परिणाम पाठीच्या आरोग्यावर होऊ शकतो आणि वेदना प्रत्यक्ष जाणवू शकतात. मानवी मणक्यांची रचना नीट कार्यरत राहण्यासाठी पाण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. शरीरातील द्रवांचे प्रमाण कमी झाले की, त्याचा परिणाम मणक्यांमधील डिस्क, सांधे, स्नायू आणि मज्जासंस्थेवर होतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे पाठदुखी कशी होते, हे समजून घेतल्यास त्यामागील प्रक्रिया अधिक स्पष्ट होते. मणक्यांमधील डिस्क या उशांसारख्या काम करतात. या डिस्क साधारणतः ८० टक्के पाण्याने बनलेल्या असतात. शरीरात पाणी कमी झाले की, या डिस्क कोरड्या पडू लागतात, त्यांचा लवचिकपणा कमी होतो आणि धक्के शोषून घेण्याची क्षमता घटते.
परिणामी, मणक्यावर अधिक ताण येतो आणि वेदना वाढतात. दीर्घकाळ पाण्याची कमतरता राहिल्यास डिस्क झिजण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते किंवा आधीच असलेल्या स्लिप डिस्कसारख्या तक्रारी तीव्र होऊ शकतात. पाठीचे स्नायू सुरक्षित राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आणि इलेक्ट्रोलाईटस आवश्यक असतात. शरीरातील सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचा समतोल बिघडला की स्नायूंमध्ये अचानक आकडी आणि ताठरपणा निर्माण होतो. यामागे पाण्याची कमतरता कारणीभूत असू शकते.
वृद्धांसाठी करा सहलीचे नियोजन! सहलीला जाण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या योग्य काळजी, जाणून घ्या सविस्तर
सांध्यामध्ये असलेले सायनोव्हियल द्रव हाडांमधील घर्षण कमी करतो. शरीरात पाणी कमी झाले, की या द्रवाचे प्रमाण घटते. परिणामी, हाडामधील घर्षण वाढते, कडकपणा जाणवतो आणि हालचाल करताना वेदना होतात. कमरेच्या आणि पाठीच्या भागात ही समस्या अधिक ठळकपणे दिसून येते. याखेरीज शरीर निर्जलित अवस्थेत असताना मज्जासंस्थेची कार्यक्षमता कमी होते, वेदनांची जाणीव अधिक तीव्र होते आणि अगदी किरकोळ हालचालीनीही दुखणे जाणवू लागते.
Ans: प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वय, लिंग, वजन आणि हवामानानुसार बदलते, पण साधारणपणे ७-८ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.
Ans: एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी घोट घोट प्या.
Ans: शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.






