नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून रामदेव बाबांची (Baba Ramdev) रुची सोया ही कंपनी चांगलीच चर्चेत आहे. ही कंपनी आपले शेअर्स विकून ४,३०० कोटी रुपये (Ruchi Soya FPO) निधी FPO च्या माध्यमातून उभे करणार आहे. यामुळे गुंतवणुकदारांना मोठी संधी असेल असं बोललं गेलं. मात्र, आता रुची सोयाच्या या निर्णयामागील खरं कारण समोर आलंय.
या कंपनीवर सध्या ३,३७५रुपयांचं कर्ज आहे. त्याचाच भाग म्हणून कंपनीला २०२५ पर्यंत ८२४ कोटी आणि २०२९ पर्यंत १५५३ कोटी रुपये फेडावे लागणार आहेत. विशेष म्हणजे या कर्जाला स्वतः रामदेव बाबा यांचा भाऊ आणि शिष्य बालकृष्ण हेच जामीनदार आहेत.
[read_also content=”Goa Tourism : गोव्यात पर्यटन कधी सुरू होणार? जायचा बेत आहे पण त्यापूर्वी, ‘हे’ आधी वाचाच https://www.navarashtra.com/latest-news/cm-of-goa-pramod-sawant-says-to-resume-tourism-activities-only-after-everybody-above-18-is-vaccinated-nrvb-144350.html”]
फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) बाबत रुची सोया कंपनीने DRHP कडे परवानगी देखील मागितली आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर शेअर्स विकून पैसे उभे करण्याचा रुची सोयाचा मार्ग मोकळा होणार आहे. रुची सोया कंपनीचा पतंजलीने ताबा घेतला त्यावेळी बँकांकडून हे कर्ज घेण्यात आलं होतं.
दुसरीकडे रुची सोयाचे ९८.९० टक्के शेअर्स प्रमोटर्सकडेच असल्यानं देखील कंपनीला सेबीच्या नियमानुसार कमीत कमी २५ टक्के शेअर्स गुंतवणुकदारांना विकणं बंधनकारक आहे. त्यामुळेही FPO आणण्याचा निर्णय रुची सोयाने घेतल्याचं सांगितलं जातंय. सेबीच्या नियमाप्रमाणे प्रमोटर स्वतःकडे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक शेअर्स ठेऊ शकत नाही.
[read_also content=”दैनिक राशीभविष्य : १९ जून २०२१; वृषभ राशीचा दिवस नवीन आशेने प्रारंभ होईल; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल https://www.navarashtra.com/latest-news/daily-horoscope-19-june-2021-the-day-of-taurus-will-begin-with-new-hope-find-out-how-your-day-will-go-today-nrvb-144313.html”]
रुची सोयाला कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बॅक ऑफ इंडिया, कॅनरा बॅक आणि इंडियन बॅकचा समावेश आहे. हे कर्ज घेण्यासाठी आचार्य बालकृष्ण, बाबा रामदेव यांचे भाऊ राम भरत आणि स्नेहलता भरत यांनी पर्सनल गॅरंटी (व्यक्तिगत हमी/जामीन) दिली होती. हे तिघे देखील कंपनीचे प्रमोटर्स देखील आहेत. आचार्य बालकृष्ण यांच्याकडे कंपनीची ९८.५४ टक्के भागीदारी आहे.
नुकताच सुप्रीम कोर्टाने एक निकाल देताना एखादी कंपनी कर्ज फेडण्यास सक्षम नसेल तेव्हा कर्जासाठी जामीन असलेल्या व्यक्ती किंवा संस्थाच्या संपत्तीतून कर्जवसूली करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे रुची सोयाने हे कर्ज न फेडल्यास बाळकृष्ण आणि रामदेव बाबा यांच्या भावावर कायदेशीर प्रक्रिया राबवल्या जाण्याचाही धोका वर्तवला जात आहे.
ruchi soya baba ramdev company have to pay bank loan of 3375 crore rupees






