कोणत्या आजारांमुळे लवकर थंडी वाजते (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना हिवाळ्यात सर्वात जास्त समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा लोकांना हलक्या वाऱ्याचाही त्रास होतो आणि त्यांच्या शरीरावर वारंवार थंडीमुळे त्रास होताना दिसतो. कमकुवत असणारे Liver, कमी रक्तदाब किंवा कमी हिमोग्लोबिन असलेल्या लोकांनादेखील खूप सहजपणे थंडी जाणवते आणि ते सतत थरथर कापत असतात. थंडीच्या दिवसात अशा व्यक्तींना अधिक त्रास होतो. पण यामागची कारणं काय आहेत अथवा कोणत्या आजारामुळे हे घडते ते आपण जाणून घेऊया.
खराब रक्ताभिसरण
शरीर उबदार ठेवण्यासाठी योग्य रक्तप्रवाह आवश्यक आहे. जर हात आणि पायांमध्ये रक्तप्रवाह खराब असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते. काही आजार, जसे की रेनॉड रोग, हृदयरोग किंवा दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे, रक्तप्रवाह मंदावू शकते, ज्यामुळे हात आणि पायांना अधिक थंडी जाणवते. त्यामुळे रक्तप्रवाह योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे
कमी लोह किंवा अशक्तपणा
शरीरामध्ये लोहाचे प्रमाण योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. लोह शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. जेव्हा लोहाची कमतरता असते तेव्हा शरीर त्याचे तापमान योग्यरित्या नियंत्रित करू शकत नाही. म्हणून, अशक्तपणा असलेल्या लोकांना सामान्य हवामानातही थंडी जाणवते. यासोबत थकवा, चक्कर येणे आणि फिकट त्वचा यासारखी लक्षणे असू शकतात. पालक, मसूर आणि लाल मांस यासारखे लोहयुक्त पदार्थ उपयुक्त आहेत.
थायरॉईड समस्या
थायरॉईड शरीराचे चयापचय आणि तापमान नियंत्रित करते. जर थायरॉईड कमी सक्रिय असेल तर शरीर कमी उष्णता निर्माण करते आणि तुम्हाला वारंवार थंडी जाणवते. इतर लक्षणांमध्ये कोरडी त्वचा, वजन वाढणे आणि सतत आळस येणे या सगळ्याचा समावेश आहे. तुम्ही रक्त चाचणी केल्यामुळे थायरॉईडची समस्या आढळू शकते. वेळीच यावर इलाज होणे गरजेचे आहे.
शरीरातील कमी चरबी
शरीरातील चरबी ही एक थर म्हणून काम करते जी शरीराचे थंडीपासून संरक्षण करते. शरीरातील जास्त चरबी असलेल्या लोकांना थंडी कमी जाणवते, तर खूप बारीक असलेल्यांना लवकर थंडी वाजते. जर तुमचे वजन कमी असेल किंवा तुम्ही खूप कमी कॅलरीज खाल्ले तर तुमचे शरीर लवकर उष्णता गमावते. निरोगी चरबी आणि प्रथिने सेवन केल्याने तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीरावर मांस असणेही आवश्यक आहे. थंडीपासून तुमचे रक्षण होण्यास मदत मिळते.
डिहायड्रेशन
कमी पाणी पिण्यामुळे शरीराचे तापमान राखणे कठीण होते. निर्जलीकरणामुळे अर्थात Dehydration मुळे रक्त प्रवाहदेखील मंदावू शकतो, ज्यामुळे तुम्हाला थंडी जाणवते. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याने ही समस्या लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. दिवसभरामध्ये साधारण ८-१० ग्लास पाणी पोटात जाणे गरजेचे आहे. हा सल्ला आपले डॉक्टरही देतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
Swami Ramdev यांचा रामबाण उपाय, शरीरातील TB, कॅन्सरच्या गाठी ठरतील जीवघेण्या
झोपेचा अभाव
झोपेच्या वेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करते आणि त्याचे तापमान राखते. जर तुम्ही कमी झोपलात तर तुमचे चयापचय मंदावते आणि तुमचे शरीर उष्णता निर्माण करू शकत नाही. दीर्घकाळ झोपेचा अभाव हार्मोनल असंतुलन आणि रक्ताभिसरण बिघडू शकते. दररोज ७-९ तास चांगली झोप घेतल्याने तुमच्या शरीराचे तापमान राखण्यास मदत होते. कितीही काम असले तरीही रोजची किमान ७ तास झोप तुम्ही घ्यायलाच हवी
पहा व्हिडिओ






