मुंबई :भारतात प्रसिद्ध असलेल्या ” मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिवल ” (Mumbai International Cult Film Festival) 15 मार्चला नुकताच मुंबईत पार पडला. या फिल्म फेस्टिवलमध्ये “बिचौलिया ” (Bichouliya) या हिंदी शॉर्ट फिल्मचे स्क्रिनींग झालं. ही भारतातील या चर्चित लघुपटाची पहिली स्क्रीनिंग होती. या लघुपटाला या महोत्सवात सात नामांकने असून या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष आणि सर्वोत्कृष्ट सिनेटोग्राफर अशी दोन पुरस्कार प्राप्त केली आहेत. फिल्मचे दिग्दर्शक प्रसिद्धी चित्रकार आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अकोल्याचे ” राज मोरे ” आहेत. तर यात सुप्रसिद्ध चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे आणि गंगुबाई आणि सिरिअस मॅन सारखे चित्रपट करणारी इंदिरा तिवारी प्रमुख भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचे लेखन नागपूरच्या समीर तभाने या तरुणाने केले आहे.
[read_also content=”आता ‘या’ देशातही समलैंगिक ओळख उघड करणं ठरणार गुन्हा! विधेयक मंजूर https://www.navarashtra.com/w”]
या लघुपटाची कथा मंटो या पाकिस्तानी लेखक आणि साहित्यकार यांच्या ‘खुशिया’ या कथेवर आधारित आहे. समीरने या कथेच रूपांत्रण केलं असुन स्क्रीन प्ले आणि संवादही समीरने लिहिले आहे.
मूळचा नागपूरच्या प्रताप नगर येथील असलेला समीर 14 वर्षांपासून मराठी हिंदी नाट्यक्षेत्रात काम करत आहे. अभिनेता म्हणून सुरुवात केलेल्या समीरला लवकरच लिखाण आणि दिग्दर्शनात रस असल्याचे समजले आणि त्याने अभिनय सोडला. रंगरसिया नाट्य संस्थेत संदीप डाबेराव यांच्या मार्गदर्शनाने तो घडला. 2009 ते 2015 पर्यंत समीरने आंतरमहाविद्यालय नाट्य एकांकिका स्पर्धेत विविध बक्षीस मिळविली. 2015 ला त्याने लिहिलेली ” मनुशोत्ती ” ही एकांकिका फार गाजली. या एकांकिकासाठी त्याला पुरुषोत्तम करंडकमधे सर्वोत्कृष्ट लेखक हा पुरस्कार ही मिळाला. ओडिशामधे आंतराष्ट्रीय महोत्सवातही ही एकांकिका महाराष्ट्राकडून सादर करण्यात आली.
2016 ला समीरची निवड ” अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टस् ” मुंबईला झाली जिथे संपूर्ण देशातून तेव्हा फक्त 25 विद्यार्थी निवडले जातात. दोन वर्ष एम ए. केल्यानंतर त्याने मुंबईत कलाक्षेत्रात नशीब आजमावण्यास सुरुवात केली. 2018 पासून त्याने मुक्तलेखक आणि प्रकाश योजनाकार म्हणुन काम करण्यास सुरुवात केली.
आता समीर हिंदी व मराठी कलाकारांना ” उर्दू ” भाषे चे धडे देतो. तसेच तो theatre of the opressed या नाट्य प्रकारचा प्रॅक्टिशनर आहे. चपराशी वडील पुरुषोत्तम तभाने व गृहिणी आई कांता तभाने यांच्या वारसाने तो अजूनही सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. समीर सध्या मुंबईतील धारावीसह अनेक परिसरात theatre of the ओप्रेस्डचे प्रयोग करतो तसेच वर्कशॅापच्या माध्यमातुन लहान मुलांना शिकवतो.
आता येत्या काळात लवकरच समीर लिखित इतरही फिल्म्स आणि नाटकं प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे. या सर्वांचे श्रेय तो आई, वडील आपले मित्र आणि रंगरसिया नागपूर नाट्य ग्रुपला देतो.