(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“द केरळ स्टोरी” हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता निर्माते तीन वर्षांनी त्याचा सिक्वेल “द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड” घेऊन परतत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला, ज्यामुळे वाद निर्माण झालेला दिसून आला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच या चित्रपटाला “विषारी, खोटा, प्रचार आणि राज्याच्या सुसंवादासाठी धोका” म्हटले असताना, आता दिग्दर्शक अनुराग कश्यपने देखील “द केरळ स्टोरी २” वर टीका केली आहे. त्याने हा चित्रपट “प्रोपगंडा” चित्रपट असल्याचे म्हटले आणि दिग्दर्शकाला “खोटा माणूस” म्हटले, तसेच “तो फक्त पैसे कमवू इच्छितो” असे देखील म्हटले आहे.
अनुराग कश्यप यांनी ही प्रतिक्रिया कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे दिली. अलीकडेच ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या त्यांच्या केनेडी या चित्रपटामुळे ते चर्चेत असताना, त्यांना ‘द केरळ स्टोरी २’ बद्दल विचारण्यात आले. यावर त्यांनी कठोर शब्दांत चित्रपटाची निंदा केली. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या बीफच्या दृश्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, ज्या प्रकारे बीफ खाऊ घालताना दाखवले आहे, त्या प्रकारे तर कोणी खिचडीही खाऊ घालत नाही. ‘द केरळ स्टोरी 2’चे दिग्दर्शन कामाक्ष नारायण सिंह यांनी केले असून, निर्माते विपुल अमृतलाल शहा आहेत. हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
रिपोर्टर: द केरल स्टोरी 2 पर आपका क्या विचार है? अनुराग कश्यप: यह एक बकवास प्रचार फिल्म है, फिल्म लोगों को विभाजित करने और नफरत फैलाने की कोशिश करती है, निर्माता एक लालची है। वह कहते रहते हैं, “ऐसे तो लोग खिचड़ी भी नहीं खिलाते जैसा फिल्म में बीफ खिला रहे हैं।” pic.twitter.com/Gp4h8uaA13 — ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) February 22, 2026
अनुराग कश्यप यांनी कोची विमानतळावर केले भाष्य
जेव्हा अनुराग कश्यप यांना ‘द केरळ स्टोरी २’ बद्दल मत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, “‘द केरळ स्टोरी 2’ हा अत्यंत निकृष्ट आणि प्रचारकी (प्रोपगंडा) चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे असे कोण बीफ खाऊ घालतो? अशा पद्धतीने तर कोणी खिचडीही खाऊ घालत नाही. या चित्रपटामागील लोकांचा उद्देश केवळ पैसा कमावणे आहे. ते सर्वांना खूश करण्याच्या प्रयत्नात समाजात फूट पाडत आहेत. या चित्रपटाचा निर्माता लालची असून त्याला फक्त पैसे कमवायचे आहेत.” असे ते म्हणाले आहेत.
Liver cancer च्या उपचारादरम्यान दीपिका कक्करला आता आणखी एक आजार; अभिनेत्रीला रुग्णालयात करणार दाखल
केरळ उच्च न्यायालयाने निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाला बजावली नोटीस
केरळ उच्च न्यायालय यांनी मागील आठवड्यात ‘केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड’च्या निर्मात्यांना तसेच Central Board of Film Certification (सीबीएफसी) ला नोटीस बजावली होती. चित्रपटाला देण्यात आलेले सेन्सॉर प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणीनंतर ही नोटीस जारी करण्यात आली.
याचिकेत ‘द केरळ स्टोरी 2’च्या टीझर आणि ट्रेलरवर आक्षेप घेण्यात आला आहे. कन्नूर जिल्ह्यातील तक्रारदार श्रीदेव नंबूथिरी यांनी याचिकेत म्हटले आहे की, चित्रपटात तीन वेगवेगळ्या राज्यांतील महिलांची आणि त्यांच्या अनुभवांची कथा दाखवली असली, तरीही चित्रपटाच्या शीर्षकात आणि काही दृश्यांमध्ये केरळची चुकीची प्रतिमा उभी करून राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.






