हिंदू धर्मात जीवनाच्या प्रत्येक पावलावर काही शुभ आणि अशुभ संकेत सांगितले गेले आहेत. सर्वसाधारणपणे लोकं केस कापणे आणि दाढी करण्यासाठी सुट्टीचा दिवस, म्हणजेच रविवारचा दिवसच निवडतात.
तथापि, सुट्टीचा दिवस असल्या कारणाने हा केस कापण्यासाठी सर्वात योग्य दिवस आहे अशी मान्यता आहे, पण आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी केस कापणे आणि दाढी करण्याचे फळही वेगवेगळे मिळत असते.
हिंदू शास्त्रांनुसार, महाभारताच्या अनुशासन पर्वात सांगितले आहे की रविवारचा दिवस सूर्याला समर्पित केलेला आहे. असं म्हणतात की, या दिवशी केस कापल्याने धन आणि बुद्धीचा ऱ्हास होतो. जाणून घेऊया कोणत्या दिवशी दाढी करणे आणि केस कापणे शुभ असते.
ज्योतिष-शास्त्रानुसार, रविवारचा दिवस सूर्याला समर्पित केलेला आहे. म्हणून या दिवशी केस कापणे आणि दाढी करण्यास मनाई आहे. असे केल्यास धन आणि बुद्धीचा ऱ्हास होतो कारण, रविवारचा दिवस हा अयशस्वीतेशी जोडला गेला आहे. म्हणून या दिवशी एखादे शुभ कार्य केल्याने अपयशच पदरी पडते. सोबतच खूपदा प्रयत्न केल्यानंतरही कामात यश मिळतच नाही. अशातच व्यक्तीचा आत्मविश्वस कमकुवत होऊ लागतो.
[read_also content=”अशी मिळवा मशरुमपासून सुंदर त्वचा; तुमच्या सौंदर्याला लागतील चार चाँद https://www.navarashtra.com/latest-news/get-beautiful-skin-from-mushrooms-your-beauty-will-take-four-moons-nrvb-135266.html”]
सोमवार (Monday) च्या दिवशी केस कापल्याने व्यक्ती नेहमी तणावाखाली वावरतो आणि याचे वाईट परिणाम आरोग्यावरही दिसून येतात. यामुळेच या दिवशी केस कापणे, दाढी करणे टाळावे. याचाच अर्थ असा की, या दिवशी आपण दाढी केली, केस कापले तर मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही विकारांचा सामाना करावा लागण्याची शक्यता आहे.
मंगळवार (Tuesday) च्या दिवशी केस कापल्याने आयुष्य कमी होते. याला अकाली मृत्यूचे कारण मानले गेले आहे.
बुधवारचा दिवस दाढी आणि केस कापण्यासाठी शुभ असतो. यामुळे धन-धान्यात वृद्धी होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. जर आपल्याला वाटतं की, माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर तशीच राहावी तर या दिवशी केस आणि दाढी करावी.
गुरुवारचा दिवस परमेश्वर विष्णूला समर्पित केला आहे. या दिवशी केस कापणे किंवा नखे कापण्यामुळे घरातली बरकत आणि सुख-शांती निघून जाते. सोबतच त्या व्यक्तीला असलेला मान-सन्मान कमी होतो. म्हणून या दिवशी या गोष्टी करु नका.
[read_also content=”भिंतींच्या फटींमुळे काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो : पावसामुळे वेगाने वाढू शकतो काळ्या बुरशीचा संसर्ग, घरात हवा खेळती ठेवा, या उपायांचा अवलंब करून ओलावा वाढण्यापासून मुक्ती मिळवा https://www.navarashtra.com/latest-news/cracks-in-the-walls-can-increase-the-incidence-of-black-fungus-rain-can-increase-the-incidence-of-black-fungus-infection-keep-the-air-in-the-house-fresh-nrvb-135225.html”]
शुक्रवारचा दिवस भोतिक सुख-सुविधांचा मानला जातो. या दिवशी केस कापणे किंवा नखे काढल्याने आर्थिक तंगीतून मुक्तता होते म्हणून या दिवशी केस कापणे आणि नखे काढणे शुभ मानलं गेलं आहे.यामुळे यश आणि लाभाची प्राप्ती होते.
शनिवारी केस कापणे अत्यंत अशुभ असतं. या दिवशी केस कापणे आणि दाढी करणे मृत्यूला कारणीभूत ठरते अशी मान्यता आहे.
Shave and cut your hair on this day not Sunday rain of money will fall