तुनिषा शर्मा (Tunisha Sharma Case) आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे नवे ट्विस्ट येत आहे. तुनिषाच्या आत्महत्येसाठी तिच्या आईने अभिनेता शीजान खानला जबाबदार ठरवलं आहे. या प्रकरणी शीजन हा १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं असून शिजानच्या आई आणि दोन्ही बहिणींनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुनिषा शर्माच्या आईने लावलेल्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शीजानची बहीण म्हणाली- तुनिशासोबत माझे बहिणीसारखे नाते होते. तुनिषाचा हिजाब घातलेला फोटो शोमधील आहे. जेव्हा आपण एक शो करतो तेव्हा आपण हिंदी शिकतो. भाषेचा धर्माशी काय संबंध? कोणतीही भाषा बोलणे म्हणजे धर्मांतर करणे नव्हे. धर्म वैयक्तिक आहे. आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. धर्मावर कुठे अडकलात. येथे मानसिक आरोग्याचा प्रश्न आहे. तुनिषाचा हिजाब घातलेला फोटो सेटवरील आहे. सीन दरम्यान तुनिषाने हिजाब परिधान केला होता. त्याच दृश्याचा हा फोटो आहे. सेटवर गणपतीचे सेलिब्रेशन सुरू होते. पवन शर्मा (टुनिशाचा मॅनेजर/काका) म्हणाले की तिने हिजाब घातला होता ते चुकीचे आहे. हिजाब वाहिनीने परिधान केला आहे, आमच्याद्वारे नाही.
तुनिषाचे त्याच्या कुटुंबाशी चांगले संबंध नव्हते. तिची आई आणि संजीव कौशल हे दोघं तिचं आयुष्य कंट्रोल करत होते. तिच्या आईची फक्त तिच्या पैशांवरच नजर होती. हिजाब, दर्गा बद्दल सांगितलेलं सर्व खोटं आहे. तिची मानसिक स्थीती खुप खराब होती. आई फक्त कामासाठी तिच्यावर दबाव टाकत होती.तुनिशा आमच्यासाठी मुलीसारखी होती. तिच्या जाण्याने आम्ही खुप खचलो आहे. असं त्यांनी म्हण्टलंय. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ती नेहमी उदास राहत होती. तिने तिचा शेवटचा वाढदिवस तिच्या वडिलांसोबत आनंदाने साजरा केला होता, त्यानंतर ती आता साजरा करणार होती. अशी माहिती त्यांनी दिली. तर, तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांच्यात काय संबंध आहे याची चौकशी केली जात असल्याच शीझानचे वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितलं आहे.
तुनिषा की मां और संजीव कौशल ही तुनिषा को पूरा कंट्रोल करते थे। संजीव कौशल का नाम सुनते ही तुनिषा को पैनिक अटैक आता था। संजीव कौशल और वनिता तुनिषा पर और उसके पैसे पर पूरा कंट्रोल करते थे: शैलेंद्र मिश्रा, शीज़ान के वकील https://t.co/c00fa8hfim
— ANI_HindiNews (@AHindinews) January 2, 2023
तुनिषा शीजान खानची आई आणि बहिणींच्या खूप जवळ होती. तुनिशासोबतचे त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुनिषाच्या अंत्यसंस्कारात शीजानची आई आणि बहिणी दिसल्या. यावेळी शीजानच्या बहिणी आणि आई रडताना दिसल्या.तुनिषा आत्महत्या प्रकरणात शीजानचे नाव समोर आल्यापासून, अभिनेत्याच्या बहिणींनी मीडिया आणि जनतेला विनंती केली आहे की तिचे मौन त्यांच कमजोरी समजू नका.