अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. काल २ सप्टेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचा मृत्यू झाला. तो या जगात नाही यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये. त्याची सर्वात जवळची मैत्रिण शहनाज गिलची अवस्था तर बघवत नाही. सिद्धार्थवर अंत्यसंस्कार पार पडले आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याची जवळची मैत्रिण शेहनाज गिलला धक्का बसला आहे. तर ओशिवारा स्मशानभूमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहे.
शेहनाज ओशिवारा स्मशानभूमित सिद्धार्थच्या अंत्यसंस्कार विधीसाठी पोहोचली होती. यावेळी तिचा भाऊ तिच्याबरोबर होता. शेहनाज तिच्या गाडीत अखंड रडत होती. तिचे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केले आहे. शेहनाजला सिद्धार्थच्या निधनाने खूप मोठा धक्का बसला आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूवेळी शहनाज त्याच्याजवळ होती आणि तिच्या डोळ्यादेखत सिडने प्राण सोडला, अशी माहिती समोर येत आहे.