देवयानी, बिग बॉस मराठी (Marathi Big boss) फेम अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या (Shivani Surve) अफेअरची नेहमीच चर्चा होते. खरंतर बिग बॉसच्या घरात असताना तिने आपली लव्ह स्टोरी किशोरी शहाणे वीज यांना सांगितली होती. पण चाहत्यांना शिवानीचा बॉयफ्रेन्ड नेमका आहे तरी कोण? याची उत्सुकता लागली होती . शिवानीदेखील आता ‘जब प्यार किया तो डरना क्या?’ (jab pyaar kiya to darna kya) म्हणत आपल्या बॉयफ्रेन्डचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिवानीच्या प्रियकराचं नाव अजिंक्य ननावरे आहे. (Ajinkya Nanaavare) अजिंक्यने गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘तू जिवाला गुंतवावे’ या मराठी मालिकेत अजिंक्य आणि शिवानाने एकत्र काम केलं होतं. याच मालिकेत काम करताना त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली. तसंच अजिंक्यने ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘सख्या रे’, ‘गर्ल्स हॉस्टेल्स’ यासारख्या दर्जेदार मालिकेत काम केलं आहे.

मराठी बिग बॉसमुळे शिवानी सुर्वे लाईमलाईटमध्ये आली. अनेक मालिकांमधून तिने आपली चुणूक दाखवली होती पण तिला खरं फेम मराठी बिग बॉसमुळे मिळालं.







