हरतालिका व्रत हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा व्रत मानला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथिवर हस्त नक्षत्रात शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यास विशेष गुण मिळतात असे म्हणाले जाते. यंदा शुक्रवार २१ ऑगस्ट रोजी हरतालिका व्रत साजरी केली जात आहे. पतीच्या दीर्घकालीन आयुष्यासाठी हा व्रत केला जातो तसेच मुलींना चांगला वर मिळावा याकरिता कुमारीका देखील हा व्रत आनंदाने करतात. या दिवशी स्त्रिया २४ तासांपेक्षा अधिक काळ निर्जला उपवास ठेवतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची हरतालिका व्रताच्या दिवशी पूजा केली जाते. शंकर – पार्वतीच्या आशीर्वामुळे हा उपवास अतिशय फलदायी मानला जातो. उत्तर भारतात या उपवासाला अन्योन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. हे व्रत नक्की कसे करावे या बाबत माहिती घेऊयात..
हरतालिके चे व्रत करायचे असेल तर जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी….