दुबई मॉलमध्ये खळबळ! इराणच्या मिसाईल हल्ल्यांदरम्यान राष्ट्राध्यक्ष आले अन्....; पहा काय घडलं? VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी दुबईतील सार्वजनिक ठिकाणी भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी दुबईतील लोकांना आपल्या नागरिकांना धीर दिला आहे. त्यांच्यासोबत दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद अल मकतूम देखील उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून इराणकडून यूएईवर हल्ले होत आहेत. दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर, पाम जुमेराह, आणि बुर्ज अल अरबवर हल्ले करण्यात आले आहेत. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हल्ल्यांदरम्यान युएईच्या राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद यांनी नागरिकांना भेट घेत त्यांना धीर दिला असल्याचे सांगितले जात आहे.
व्हायरल व्हिडिओ
رئيس الدولة يرافقه حمدان بن محمد في دبي مول مساء اليوم. لا تشلّون هم، فالإمارات آمنة ومطمئنة، وقيادتها بين أهلها وقريبة من شعبها. pic.twitter.com/gfgiIe5Bsu — Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 2, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @DXBMediaOffice या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यजू आणि लाईक्स मिळाले आहेत. यूएईच्या राष्ट्राध्यक्षांचे सर्वत्र कौतुकही होत आहे. परंतु अद्याप या व्हिडिओची पुष्टी झालेली नाही. हा व्हिडिओ इराणच्या मिलाइल हल्ल्यादरम्यान आहे की आधीचा हे स्पष्ट नाही.
दुबईत अमेरिकेने मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. अशी परिस्थिती दुबईवर हल्ल्या झाल्यास आर्थिक फटका अमेरिकेच्या कंपन्यांना बसू शकतो. यामुळे अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इराण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






