या आठवड्यात या मंचावर या सर्व लिटिल चॅम्प्सच कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या गाण्यांचा आनंद घेण्यासाठी २ सुप्रसिद्ध अभिनेत्री सज्ज होणार आहेत. एव्हरग्रीन अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज आणि अप्सरा सोनाली कुलकर्णी या दोघी या मंचावर आपल्या उपस्थितीने बहार आणणार आहेत.
इतकंच नव्हे तर लिटिल चॅम्प्स या अभिनेत्रींची काही गाणी सादर करणार आहेत आणि त्यांना मंचावर ताल धरायला भाग पडणार आहेत.
सोनाली कुलकर्णी हिने सर्व लिटिल चॅम्प्सना त्यांना या वयात लाभलेला आवाज हि त्यांना मिळालेली देणगी आहे असं म्हणत त्यांचं कौतुक केलं. तसेच किशोरी ताई, सोनाली, मृण्मयी आणि कार्तिकी यांनी चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर ठेका धरला.