घटना.
१४९८ : पश्चिम गोलार्धात तिसरा प्रवास करताना ख्रिस्तोफर कोलंबस हे त्रिनिदाद बेटांचा शोध लावणारे पहिले युरोपीय ठरले.
१६५७ : मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.
१६५८ : औरंगजेब मुघल सम्राट बनला.
१८५६ : न्यूझीलंडची राजधानी ख्राइस्ट चर्चची स्थापना.
१९३७ : के. नारायण काळे यांनी दिग्दर्शित केलेला वहाँ हा प्रभातचा चित्रपट मुंबईतील मिनर्व्हा टॉकीजमधे प्रदर्शित झाला.
१९५४ : इटालियन गिर्यारोहकांनी के-२ (माउंट गॉडविन ऑस्टिन) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर प्रथमच सर केले.
१९५६ : कसोटी सामन्यातील एका डावात सर्व १० गडी बाद करण्याचा विक्रम करणारा जिम लेकर हा पहिला गोलंदाज बनला.
१९६४ : रेंजर-७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.
१९९२ : जॉर्जियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९२ : सतार वादक पं. रविशंकर यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान.
२००० : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि प्रगत तंत्रज्ञान केंद्राचे डॉ. डी. डी. भवाळकर यांना एच. के फिरोदिया पुरस्कार प्रदान.
२००१ : दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान.