विवेकानंद हे बहुआयामी, प्रज्ञावंत व्यक्तिमत्त्व होते. विवेकानंदांचे संपूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथबाबू दत्त. त्यांची जन्मतारीख १२ जानेवारी १८६३. विवेकानंदांची शरीरयष्टी भरदार, रुबाबदार होती. संमोहित करणारे डोळे, डौलदार चाल यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व राजबिंडे दिसायचे. तरुणतरुणींचे ते आदर्श; मी विवेकानंद नेहमी अध्यात्म विषयावर बोलायचे की,
‘नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
अंती जाशील एकाला रे, प्राण्या माझे माझे म्हणोनी’
अंतकाळी कोणीच वाचवायला येत नाही. उलट सगळे सोडून जातात. प्रसिद्ध उदाहरण गजेंद्र आहे. शेजीची कमिन दुरी राहे, हे तुकाराम महाराज सांगतात. मानवाने स्वत:ला जाणले पाहिजे हाच खरा परमार्थ आहे. अध्यात्म वेगळे आणि धर्म वेगळा आहे. धर्म नीती नियम, विहित निषिद्ध काय आहे?याची शिकवण देतो, पण अध्यात्म मात्र ‘तू कोण आहेस हे शिकवितो. आत्म्याचे यथार्थ रूप अध्यात्म शिकविते. तू कोठून आलास, तुला कोठे जायचे आहे? हे अध्यात्म शिकविते. म्हणून हे बंधो ! तू सार-असार याचा विचार कर, खरे काय खोटे काय याचा विचार कर. तोही या इहलोकीच आणि येथेच व आत्ता कर. तरच काही तरणोपाय होईल, अन्यथा अवघड आहे. असे स्वामी विवेकानंद म्हणतात. स्वत:ला जाणणं हेच खरे अध्यात्म.






