मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता जानेवारी २०२५ ते१५ फेब्रुवारी २०२६ अभियानास भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.सन २०२५-२६ मधील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३ हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह हे अभियान राबविले गेले.या अभियानात सन २०२४-२५ या वर्षी रायगड जिल्हा प्रथम पारितोषिक मिळवले होते. या वर्षी तिसऱ्या टप्प्यात माथेरान शहरातील वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेने सक्रीय सहभाग घेत उंच भरारी घेतली आहे.
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेचे शिक्षण मंडळाची शाळा असलेल्या या शाळेने यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जिल्हा आणि विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणच्या शाळेने राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मधील राज्यस्तरावरील मूल्यांकन करण्यात आले.राज्यस्तरीय मुल्याकंन समितीने माथेरान मध्ये येऊन शाळेने अभियान काळात केलेल्या उपक्रम आणि पायाभूत सुविधा यांची पाहणी केली.
मूल्यांकन समितीचे शिक्षण संचालक डॉ महेश पालकर,शिक्षण उप संचालक सुचेता पाटेकर,नंदुरबार जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भानुदास रोकडे,परभणी येथील जिल्हा शिक्षण अधिष्ठाता डॉ प्रल्हाद खुणे यांचे स्वागत आणि अभियानामध्ये शाळेने केलेल्या कार्याची माहिती माथेरान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे आणि तालुका गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी दिली.
माथेरान येथील हुतात्मा वीर भाई कोतवाल प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची वाचनाची आवड वाढावी यासाठी ग्रंथालय तसेच वाचन कट्टा वाचन कोपरे आणि पुस्तक पेढी तयार आहे.प्राथमिक विद्या मंदिर मध्ये विज्ञान प्रयोगशाळा असून कार्यालयासाठी स्वतंत्र्य कार्यालय आणि पुरेशे वर्ग देखील उपलब्ध आहेत.शाळेच्या भिंती रंगीबेरंगी फुलांनी रंगवल्या असून शाळेच्या भिंतीवर प्राणी पक्षी फुले आदी सर्व काही असल्याने शाळेच्या आवारात आलेला पर्यटक देखील काही वेळ तेथे खिळून राहतो.येथे खेळण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असून खेळताना एखादा विद्यार्थी जखमी झाला तर त्यासाठी प्रथमोपचार पेटी शाळेत उपलब्ध आहे.
शाळेत पिण्याच्या पाण्यातून साथीचे रोगाना निमंत्रण दिले जाऊ नये यासाठी जलशुद्धीकरण संच सह पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कक्ष असून तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.वर्ग खोल्या तेथे पुरेशा असल्याने विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सुटसुटीत असलेली शाळा म्हणून माथेरान शाळेने नवीन पायंडा आपल्या विद्यार्थी बैठक व्यवस्थेतून घालून दिला आहे.आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्कालीन कक्ष उपलब्ध असून शालेय सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलेली ही शाळा असून चाईल्ड हेल्प लाइन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण हेल्प लाइन यांची माहिती देण्यात येत असते.
सरकारी विजेवर अवलंबून न राहता येथे सोलर चे माध्यमातून शाळेला वीज पुरवठा होतो.शाळेत महावाचंन चळवळ आयोजित केली जाते आणि त्यातून वाचनाची आवड जोपासण्याचा प्रयत्न केला जातो.या शाळेने हरित महाराष्ट्र सुंदर महाराष्ट्र अभियानात सहभाग घेत अनेक वृक्षांची लागवड केली असून एक पेड माँ के नाम मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग घेतला आहे.शाळेचा परिसर विद्यार्थी शिक्षण आणि क्रीडा केंद्रित असावा यासाठी प्रयत्न केला आहे.
पालिकेची शाळा असूनही असलेल्या सोयी सुविधा
पर्यावरण स्नेही इको क्लब
कचरा व्यवस्थापन
पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था
स्वतःचे मैदान आणि खेळाचे साहित्य
इंटरनेट आणि वायफाय सुविधा
डिजिटल प्रयोगशाळा..
शाळेत सेंद्रिय खतावर आधारित परसबाग
विद्यार्थ्यांची १०० टक्के आधार वैधता
संच मान्यता पोर्टल कार्यान्वित
ग्रंथालयात पाच पट पुस्तक आणि त्यात जगातील भाषेतील पुस्तके उपलब्ध
तंबाखूमुक्त शाळा
एन सी सी,आर एस पी,स्काऊट गाईड, कब बुलबुल उपक्रम
अमली पदार्थ विरोधी गट
सखी सावित्री समिती
शाळा परिसर सीसीटीव्ही कॅमेरा यांचे कक्षेत
अभ्यागत आगमन आणि निर्गमन नोंद वही
कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी
विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक ई रिक्षा मधून सुरक्षित वाहतूक
गुणवत्ता वाढीसाठी विद्यांजली पोर्टल वर नोंदणी
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आकर्षक रॅम्प
दरवर्षी शाळेचे वार्षिक नियोजन
करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन
क्षेत्र भेटी आणि ऐतिहासिक वास्तू तसेच ऐतिहासिक वस्तूंचे जतन
भाषण आणि वाचन क्षमता
शाळकरी मुलांसाठी या सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत.






