सौजन्य- सोशल मीडिया
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता नागा चैतन्यने आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालाने गुपचूप साखरपुडा केला. आता त्यांच्यानंतर आणखी एका सेलिब्रिटीने गुपचूप लग्न उरकलं आहे. अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरकने गुरुवारी (२२ ऑगस्ट) गुपचूप लग्न केले.
हे देखील पाहा – जान्हवीची दादागिरी बंद होणार, रितेश देशमुख बाहेरचा रस्ता दाखवणार?
किरणने आणि रहस्याने कर्नाटकमधील कूर्गमध्ये लग्न केलं. दोघांनीही २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांना डेट करीत आहेत. चार वर्ष आपलं नातं गुपित ठेवल्यानंतर या जोडप्याने मार्च २०२४ मध्ये साखरपुडा केला. १३ मार्च २०२४ रोजी हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. आता साखरपुड्यानंतर या जोडप्याने गुपचूप लग्न उरकलं आहे. किरणने लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
दोघांनीही लग्नात पारंपारिक पद्धतीतले कपडे कॅरी केले होते. दोघेही लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. किरणने लग्नात क्रीम कलरचा कुर्ता आणि पायजमा, सोनेरी जरीचे उपरण आणि स्टायलिश फेटा असा लूक केला होता. तर रहस्याने दाक्षिणात्य परंपरेप्रमाणेची गोल्डन साडी वेअर केली होती. तिने लूकला साजेसा मेकअप करून आणि दागिने कॅरी करत आपला लूक पूर्ण केला होता. दोघेही लग्नामध्ये खूपच सुंदर दिसत होते. किरण आणि रहस्या यांच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटी मित्रांकडून जोडप्याचे अभिनंदन केले जात असून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
हे देखील पाहा –