फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs New Zealand Toss Update : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिल्या सामन्याचा शुभारंभ झाला आहे. या पहिल्या सामन्याआधी भारताच्या संघाला मोठा धक्का बसला. भारताचा विकेटकिपर सरावाच्या वेळी जखमी झाला आहे त्यामुळे त्याच्या जागेवर ध्रुव जुरेल याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. आजच्या सामन्यामध्ये कोणता विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याआधी सामन्यामध्ये नाणेफेक झाले आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
विश्वचषकाआधी भारतीय संघाची हि महत्वाची मालिका आहे. या मालिकेमध्ये तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी20 सामने न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत. शुभमन गिल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत खेळला नाही. आता त्याचे संघामध्ये पुनरागमन होणार आहे तर श्रेयस अय्यरचे देखील संघामध्ये पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या एकदिवसीय मालिकेचा भाग नाहीत. त्यामुळे आज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करताना दिसणार आहेत.
🚨 Toss Update 🚨 #TeamIndia elect to bowl in the 1st ODI in Vadodara Updates ▶️ https://t.co/OcIPHEpvjr#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vR8u8TcbH5 — BCCI (@BCCI) January 11, 2026
मोहम्मद सिराजचे भारतीय एकदिवसीय संघामध्ये पुनरागमन बऱ्याच महिन्यानंतर होणार आहे. तो बराच वेळ कसोटी संघाचा भाग होता त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डी प्लेइंग 11 मधून वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताच्या संघामध्ये विकेटकिपरची भूमिका केएल राहुल सांभाळणार आहे. टीम इंडियाने सहा गोलंदाजी पर्यायांसह जाण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांचे लक्ष प्रामुख्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर आहे. श्रेयस अय्यर अखेर तीन महिन्यांनंतर टीम इंडियाच्या जर्सीवर परतला आहे. तो त्याच्या नंबर ४ वर खेळताना दिसेल.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, वाॅशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा
डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे, मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झॅक फॉक्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, आदित्य अशोक






