चिखली : तिरोडा पोलिसांनी निलागोंदी शिवारात धाडसत्र राबविले. या ठिकाणी मोहफुलाची दारु गाळत असलेले आरोपी पोलिसांनी बघून पळाले. घटनास्थळावरून साडेचार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिरोडा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना सिल्ली ते निलागोंदी झुडपी जंगलात सिल्ली येथील संजय सोविंदा बरीयेकर हा मोहफुलाची दारु गाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
[read_also content=”वडनेर पोलिसांच्या वाहनाचा अपघात, तीन पोलिस कर्मचारी जखमी https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/three-police-personnel-injured-in-wadner-police-vehicle-accident-nraa-256448.html”]