हिवाळ्यात बंद असलेले बद्रिनाथ धामचे (Badrinath Dham) दरवाजे आज सकाळी ६ वाजता उघडले. गेल्या दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा बद्रिनाथमध्ये यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या बद्रिनाथ परिसरामध्ये कडाक्याची थंडी आहे. मात्र, या थंडीतही हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. कोरोना निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानं यंदा बद्रिनाथ यात्रेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षानंतर यंदा बद्रिनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.
बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले. दरवाजे उघडण्यापूर्वी बद्रीनाथ मंदिर फुलांनी आणि दिव्यांनी सजवण्यात आलं होतं. बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी सायंकाळी ६.१५ वाजता धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि लष्करी बँडच्या सुरांनी भाविकांसाठी खुले करण्यात आले. बद्रीनाथ धाममध्ये भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत.
[read_also content=”खासदार नवनीत राणा आज 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार https://www.navarashtra.com/maharashtra/mp-navneet-rana-will-interact-with-the-media-today-at-11-am-nrps-277398.html”]