पुणे : महापालिकेत समाविष्ट गावांमधील नोकरभरतीचा मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेतून नोकरभरती प्रकरणाची फाईलच गायब झाली आहे. ही फाईल गेली कुठे, याचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांना सांगितले होते. मात्र, त्यांची शासनाने बदली केली आहे.
पुणे महापालिकेत २३ गावांपैकी १७ गावे समाविष्ट
पुणे महापालिकेत २३ गावांपैकी १७ गावांमध्ये झालेल्या नोकरभरती प्रकरणी जिल्हा परिषदेने तपास केला होता. या गावातील सुमारे ६८७ जणांच्या नोकरभरती ही बेकायदा ठरविल्याचा अहवाल मुंडे समितीने दिला होता. या संदर्भात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यासाठी लाच लुचपत विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामविकास विभागाकडे पाठविला होता.